महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून (Gadchiroli) छत्तीसगड मॅकल पर्वतरांग आणि मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) बालाघाट कान्हाच्या जंगलाला थेट जोडणाऱ्या वन कॉरिडॉरमधून नक्षलींनी आपला गाशा गुंडाळला आहे. नक्षली (Naxal Activities) या भागाला आपला रेड कॉरिडॉर (Red Corridor) बनवत होते, जो एमएमसी झोनचा सर्वांत सुरक्षित एरिया मानला जात आहे. तीन राज्यांतील कारवायांसाठी नक्षली येथे रेशन, कपडे, शस्त्र आणि स्फोटके लपवत होते.
(हेही वाचा – P. L. Deshpande Maharashtra Kala Academy च्या नूतनीकृत संकुलाचे उद्घाटन २ मार्चला)
गेल्या काही वर्षांत छत्तीसगड-मध्यप्रदेश पोलिसांच्या टीमने जंगलातील ३५० हून अधिक डंप पॉइंट शोधून काढले होते. पोलिसांनी येथे डंप स्फोटकांसोबत अन्य सामग्री जप्त केली. यानंतर नक्षल संघटनेने मागे हटत सर्वात सुरक्षित जंगलातून डंप एरिया (Dump area) नष्ट केला आहे. याशिवाय आणखी एक बदल झाला आहे. तीन राज्यांत कोणतीही घटना घडवण्यासाठी या कॉरिडॉरमध्ये बैठका होत होत्या. या बैठका ५ वर्षांपासून बंद झाल्या आहेत, अशा बैठकांची कोणतीही माहिती गुप्तचर विभागाला मिळाली नाही.
या भागांत तीन राज्यांच्या सीमेवर पोलिसांचे बेस कॅम्प सुरू आहेत. येथे छत्तीसगडसह मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रचे सुरक्षा दल संयुक्त कारवाई करते. याशिवाय तीन राज्यांच्या पोलीस दलात समन्वय वाढला आहे. (Naxal Activities)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community