नक्षली कमांडरचा कोरोनामुळे रुग्णालयात मृत्यू! 

मृत नक्सली कमांडर आयतुला रुग्णालयात दाखल करून परत येत असताना तीन अन्य नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केली. त्या तिघांमध्ये एक नक्षली कोरोना संक्रमित आढळला आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र 

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या तेलंगानाच्या कोत्तागुड़म जिल्ह्यात कोरोनाने संक्रमित झालेल्या नक्षली कमांडरला रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याची प्रकृती खालावली व तिथेच त्याचा मृत्यू झाला. कोरोना संक्रमित मृत नक्षलवाद्याचे नाव कोरसा गंगा उर्फ़ आयतु असे आहे.

कोरोनाग्रस्त नक्षलीला रुग्णालयात दाखल करून परतणारे नक्षली गजाआड!

या मृत नक्षली कमांडर आयतुला रुग्णालयात दाखल करून परत येत असताना तीन अन्य नक्षलवाद्यांना पोलिसांनी अटक केली. त्या तिघांमध्ये एक नक्षली कोरोना संक्रमित आढळला आहे. अटक करण्यात आलेल्या नक्षल्यांकडून स्फोटके जप्त करण्यात आली. या घटनेमुळे नक्षलवाद्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळाली आहे. तेलंगाना पोलिसांचा ठाम विश्वास आहे की, नक्षलवाद्यांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने नक्षली कमांडरही कोरोनाच्या विळख्यात आले आहेत.

(हेही वाचा : धक्कादायक! माओवाद्यांचा ७०० शाळकरी मुलांसाठी ट्रेनिंग कॅम्प!)

नक्षलवाद्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचा दावा!

नक्षलवादी संघटनांमध्ये कोरोनाच्या वाढत्या संक्रमनाबद्दल छत्तीसगड पोलिसांनी अगोदरच पुष्टी दिली होती. दंतेवाडाचे एसपी अभिषेक पल्लव यांनी माहिती देताना म्हटले होते की, 10 पेक्षा जास्त नक्षली कोरोनाने मृत्युमुखी पडले आहेत आणि अंदाजे 200 माओवादी कोरोना व फूड पॉयजनिंगमुळे आजारी आहेत. त्यानंतर शरण आलेल्या काही नक्षलवाद्यांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here