नक्षलवाद्याच्या भावाची नक्षलींकडून गोळ्या झाडून हत्या

रात्रीच्या सुमारास भोगा झोपला असताना काही शस्त्रधारक नक्षली त्याचा घरी आले व जवळील जंगल परिसरात नेऊन त्याच्यावर बंदुकीच्या गोळ्या झाडून नक्षलवादी जंगलात पसार झाले. 

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील वडगाव गाऱ्यपत्ती गावात १९ मे रोजी रात्री सुमारास १०.३० वाजता दायसिंग अकुलू भोगा (40) यांची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या सुमारास भोगा झोपला असताना काही शस्त्र धारक नक्षली त्याचा घरी आले व जवळील जंगल परिसरात नेऊन त्याच्यावर बंदुकीच्या गोळ्या  झाडून नक्षलवादी जंगलात पसार झाले.

या घटनेमुळे पुन्हा एकदा नक्षलवाद्यांची दहशत वाढली असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासाठी आता हे नक्षलवादी थेट घरामध्ये घुसून लोकांच्या हत्या करू लागले आहेत. यामुळे आता परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत ज्याचा खून करण्यात आला, ते दायसिंग भोगा याचा भाऊ यशवंत भोगा हा नक्षलवादी होता, त्याला पोलिसांनी अटक केली. हे अटक या हत्येमागील कारण असण्याचाही शक्यता आहे.

(हेही वाचा : पंचनामे पूर्ण होताच कोकणाला मदत! मुख्यमंत्र्यांची घोषणा )

भाऊ ७ वर्षांपासून नक्षली चळवळीत होता!

सदर दायसिंग यांचे भाऊ यशवंत भोगा यांनी गेल्या सहा सात वर्षांपासून नक्षल चळवळीत अनेक चळवळीमध्ये त्यांनी सहभागी राहून ते काम करत होते. गेल्यावर्षी त्यांना अटक करण्यात गडचिरोली पोलिसाना यश आले. त्यांच्या हत्येचे कारण स्पष्ट झाले नसले तरी या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक घटनास्थळी जाऊन पंचनामा करून गुन्हा दाखल केला. पुढील तपास करून हत्येचे कारण स्पष्ट तापास करुन नक्षलवाद्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे गडचिरोलीतील पोलिस अधिक्षक अंकीत गोयल म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here