मीरा रोड येथे रामलल्लाच्या मिरवणुकीवर झालेल्या हल्ल्यानंतर भाजप नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. या वेळी त्यांनी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. (Mira Road Naya Nagar)
रोहिंग्या आणि बंगलादेशी मुसलमानांची मस्ती वाढली
या वेळी माध्यमांशी बोलतांना राणे यांनी नयानगर येथील धर्मांधांना कडक इशारा दिला. ‘२२ जानेवारी (Ayodhya Rammandir) हा हिंदूंसाठी मोठा दिवस होता; म्हणून हिंदू बाहेर पडले होते. तरीही त्यांनी टारगेट केले गेले. असे यापुढे चालणार नाही. नया नगर भागात रोहिंग्या (Rohingya) आणि बंगलादेशी मुसलमानांची (Bangladeshi Muslims) मस्ती वाढली आहे. राज्याचे गृहमंत्री हे कट्टर हिंदू असून आम्ही नया नगरला पाकिस्तान होऊ देणार नाही’, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
या वेळी नितेश राणे यांनी दगडफेकीच्या घटनेत जखमी झालेल्यांची भेट घेतली. पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांची भेट घेऊन दोषींवर कडक कारवाईची मागणी केली. परिस्थिती हाताळण्यात पोलीस निष्पळ ठरल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.
(हेही वाचा – Weather Forecast: १ फेब्रुवारीपर्यंत महाराष्ट्रात थंडी जाणवणार, हवामान विभागाचा अंदाज; वाचा सविस्तर)
… तर परत कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही
नया नगरमध्ये आतापर्यंत 35 मुलींचे धर्मांतर झाले आहे. काल अतिक्रमणविरोधी पथकाने बुलडोझरने कारवाई केली आहे. हे असेच चालू राहिले, तर आम्ही आमचा बुलडोझर आणून रस्ता मोकळा करू. आमचा बुलडोझर चालला, तर परत कोणी वाकड्या नजरेने पाहणार नाही, अशी चेतावणी राणे यांनी या वेळी दिली. (Mira Road Naya Nagar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community