आता वसई-मुंबई दरम्यानचे अंतर होणार कमी! किती वेळात पोहोचता येणार?

140

नायगावच्या पूर्व पश्चिमेला जोणडा-या पुलाचे काम शुक्रवारी मध्यरात्री पूर्ण झाले. या पुलाच्या एकूण दहा गर्डरपैकी शेवटचे दोन स्टीलचे गर्डर शुक्रवारी मध्यरात्री मेगाब्लाॅक असताना टाकण्यात आले. त्यामुळे या पुलाच्या अंतिम टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. या पुलामुळे आता वसई- मुंबई हे अंतर 25 किलोमीटरचे कमी होणार आहे. त्यामुळे आता वसई ते मुंबई प्रवास जलद गतीने होणार आहे.

अखेर कामाला वेग

काॅंक्रिटीकरण व दिवे लावण्याची कामे पूर्ण करुन, हा पूल नागरिकांच्या सेवेत दाखल होण्यासाठी अजून दोन महिन्यांचा कालावधी लागणार असल्याची, माहिती एमएमआरडीएच्या अभियंत्यांनी दिली आहे. कोरोना संकटामुळे मधल्या काळात या पुलाचे काम मंदावले होते. त्यात पश्चिम रेल्वेने मेगाब्लाॅकही दिला नव्हता, परंतु आता रेल्वेने मागील दोन दिवसांत मध्यरात्री सलग दोन दिवस मेगाब्लाॅक दिल्याने या पुलाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले.

गर्डरचे उद्घाटन

या पुलाच्या कामाला मुबंई महानगर विकास प्राधिकरणामार्फत 2015 मध्ये मंजुरी मिळाल्यानंतर, कामाला सुरुवात करण्यात आली होती. शुक्रवारी दोन्ही गर्डर बसवण्याआधी गुरुवारी पुलाच्या पूर्व रेल्वे परिसरात एकूण पाच स्टील गर्डर लाॅन्चिंगचे उद्घाटन झाले.

( हेही वाचा :एसटीचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार ? )

मागणी पूर्ण 

या पुलाच्या कामाला उशिरा का होईना गती मिळाल्याने, आता लवकरच हा पूल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार आहे. अंतिम टप्प्यात दोन गर्डर शुक्रवारी मध्यरात्री बसवण्यात आले. वसई- मुंबई हे अंतर कमी व्हावे, यासाठी पूल असावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून करण्यात येत होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.