- ऋजुता लुकतुके
देशात सध्या मोठमोठे पायाभूत सुविधा उभारणी प्रकल्प उभे राहत आहेत. रस्ते बांधणी, पूल उभारणी, रेल्वेचं जाळं अशा प्रकल्पांना निधी उभा करणं सोपं जावं यासाठी केंद्र सरकार (Central Govt) एक खास एनबीएफसी (NBFC) म्हणजे बँकेतर वित्तीय संस्था उभी करण्याच्या प्रयत्नांत आहे. (NBFC For Infra Projects)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी २०१८-१९ च्या अर्थसंकल्पातच अशा संस्थेच्या उभारणीची घोषणा केली होती. पण, तेव्हा सरकारमधील विविध विभागांचा तिला विरोध होता. पण, आता अशा एनबीएफसीच्या उभारणीची तयारी पूर्ण झाल्याचं समजतंय. (NBFC For Infra Projects)
ही संस्था विविध इन्फ्रा कंपन्यांना भक्कम आर्थिक आधार देईल. इन्फ्रास्ट्रक्चर बाँडना ही संस्था जामीन राहील. त्यामुळे इन्फ्रा कंपन्यांचं क्रेडिट रेटिंग सुधारून त्यांना चांगल्या दराने कर्ज उपलब्ध होईल. अशी संस्था दीर्घ मुदतीची गुंतवणूक इन्फ्रा प्रकल्पात होईल याचीही काळजी घेईल. (NBFC For Infra Projects)
(हेही वाचा – CM Eknath Shinde : मराठा आरक्षणासाठी युध्दपातळीवर सर्वेक्षण सुरु)
१११ ट्रिलियन अमेरिकन डॉलर गुंतवणूक करण्याचे लक्ष
सध्या देशभरात इन्फ्रा प्रकल्पांमध्ये ८ ते ९ ट्रिलियन अमेरिकन डॉलरची गुंतवणूक होत आहे. पण, त्यासाठी खास इन्फ्रा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करेल असा वित्तीय संस्थेची गरज निर्माण झाली आहे, असं सरकारला वाटतंय. आणि त्या दृष्टीने आगामी अर्थसंकल्प (Budget) लेखानुदान असला तरी त्यात या संस्थेसाठी तरतूद करण्यात येईल, असा जाणकारांचा होरा आहे. (NBFC For Infra Projects)
२०२० ते २५ या कालावधीत देशांतर्गत पायाभूत सुविधा उभारणी प्रकल्पांमध्ये सरकारने १११ ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूक करण्याचं ठरवलं आहे. सध्या इन्फ्रा कंपन्यांच्या वित्त पुरवठ्यासाठी सरकारकडून नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर क्रेडिट एनहान्समेंट लिमिटेड ही कंपनी काम करते. पण, ही कंपनी सर्व प्रकारच्या इन्फ्रा प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करत नाही. आणि तिची व्याप्तीही छोटी आहे. आता बँकेतर वित्तीय संस्थेच्या स्थापनेनंतर हे चित्र बदलू शकेल, असा अंदाज आहे. (NBFC For Infra Projects)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community