दानिश चिकनाच्या भावाला एनसीबीकडून समन्स

डोंगरीत दानिश चिकना हा देखील ड्रग्सची दुकाने उघडून बसला होता, ती देखील एनसीबीने उद्ध्वस्त करून त्याला राजस्थानच्या कोटा येथून गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली.

राजस्थानमधून अटक करण्यात आलेल्या ड्रग्स माफिया दानिश चिकना याचा भाऊ राजीक चिकना याला एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. दानिश चिकना याच्या ड्रग्सच्या काळ्या धंद्यात राजीक याचे संबध असल्याचा संशय एनसीबीला असून त्यासंदर्भात त्याला समन्स पाठवण्यात आले आहे.

डोंगरीतील ड्रग्सचे हब उद्ध्वस्त!

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा एकेकाळचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या डोंगरी हे ड्रग्सचे हब असल्याचे एनसीबीच्या केलेल्या कारवाईत उघडकीस आले आहे. आरिफ भुजवाला, दानिश चिकना या दोघांनी तर डोंगरीत ड्रग्सची फॅक्ट्री उघडून ठेवल्या होत्या. एनसीबीने या दोन्ही फॅक्ट्री उद्ध्वस्त करून अनेक ड्रग्स माफियाची डोंगरीमधून अटक केली आहे. मात्र आरिफ भुजवाला एनसीबीच्या हाती लागला नाही.

(हेही वाचा : अखेर माजी गृहमंत्री देशमुख यांचीही सीबीआय करणार चौकशी!)

राजस्थानात अटक केली दानिशला!

डोंगरीत दानिश चिकना हा देखील ड्रग्सची दुकाने उघडून बसला होता, ती देखील एनसीबीने उद्ध्वस्त करून दानिश चिकना याला राजस्थानच्या कोटा येथून गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली होती. दानिश हा दाऊदचा नजीकचा साथीदार  युसूफ चिकना याचा मुलगा आहे. दानिशच्या अटकेनंतर एनसीबीने त्याचा भाऊ राजीक चिकना याला एनसीबीने समन्स पाठवले असून या प्रकरणात त्याला चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. दानिश याच्यावर डोंगरी पोलीस ठाण्यात खंडणी, मारामारी, खुनाचा प्रयत्न या सारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. एमडीचा मोठा सप्लायर म्हणून दानिशचे नाव समोर आले असून फुटपाथवर राहणाऱ्या मुलांना ड्रग्सचे व्यसन लावून दानिश मुलांच्या माध्यमातून ड्रग्स सप्लाय करीत असल्याचे समोर आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here