NCBC ने महाराष्ट्रासाठी केंद्रीय OBC यादीत 7 समुदायांचा समावेश करण्याची केली शिफारस

76
NCBC ने महाराष्ट्रासाठी केंद्रीय OBC यादीत 7 समुदायांचा समावेश करण्याची केली शिफारस

राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाने (NCBC) केंद्र सरकारकडे (i) लोध, लोधा, लोधी (Lodh, Lodha, Lodhi) या ओबीसी जाती/समुदायांचा समावेश करण्याबाबत शिफारस केली आहे. तसेच (ii) बडगुजर (Badgujar), (iii) सूर्यवंशी गुजर (Suryavanshi Gujar), (iv) लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर (Leve Gujar, Reve Gujar, Reva Gujar); (v) डांगरी (Dangari); (vi) भोयर, पवार (Bhoyar, Pawar); (vii) कपेवार, मुन्नार कपेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तेलंगी, पेंताररेड्डी, बुकेकरी (Kapewar, Munnar Kapewar, Munnar Kapu, Telanga, Telangi, Pentarreddy, Bukekari) जाती/समुदाय महाराष्ट्र राज्यासाठी इतर मागासवर्गीय (OBC)च्या केंद्रीय यादीत समावेश करण्याची विनंती केली आहे. (NCBC)

(हेही वाचा – Cabinet Meeting : कॅबिनेटच्या बैठकीत महायुती सरकारचे ‘विक्रमी ८०’ निर्णय; पत्रकार तसेच वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र महामंडळ)

याबाबत, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे (NCBC) अध्यक्ष हंसराज अहीर आणि आयोगाचे सदस्य भुवन भूषण कमल यांचा समावेश असलेल्या आयोगाच्या दोन सदस्यीय खंडपीठाने 17 ऑक्टोबर 2023 आणि 26 जुलै 2024 रोजी मुंबई येथे यासंदर्भात सुनावणी घेतली होती. मंगळवारी 8 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्याच्या ओबीसींच्या केंद्रीय यादीत वरील जातींचा समावेश करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आल्याची माहिती, केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय विभागाने दिली आहे. (NCBC)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.