केंद्र सरकारने शुक्रवारी (१४ जुलै) दिल्ली-एनसीआरमध्ये टोमॅटोंच्या वाढत्या किंमती कमी करण्यासाठी एक योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत, कृषी विपणन संस्था नॅशनल कोऑपरेटिव्ह कंझ्युमर फेडरेशन ऑफ इंडिया (NCCF) शहरात ९० रुपये प्रति किलो दराने टोमॅटो विकत आहे.
सध्या देशभरात अनेक ठिकाणी टोमॅटो २०० रुपये किलोने विकला जात आहे. दिल्ली-एनसीआरनंतर सरकार लवकरच इतर शहरांमध्येही टोमॅटो स्वस्तात विकायला सुरुवात करणार आहे. NCCF दिल्ली पहिल्या दिवशी शुक्रवारी करोल बाग, पटेल नगर, पुसा रोड, नेहरू प्लेस CGO, नोएडा सेक्टर ७८, परी चौक, ग्रेटर नोएडा आणि रजनीगंधा चौक येथे टोमॅटोची विक्री करत आहे. NCCF शुक्रवारी दिल्ली-NCR मध्ये सुमारे १७,००० किलो टोमॅटो विकणार आहे.
(हेही वाचा – अर्थ खातं अजित पवारांकडेच, शिवसेनेकडील अत्यंत महत्त्वाचं खातंही राष्ट्रवादी काँग्रेसला)
त्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी सुमारे २० हजार किलो टोमॅटोची विक्री करून ती दररोज ४० हजारांपर्यंत वाढवण्याची योजना आहे. NCCF चे व्यवस्थापकीय संचालक अनीस जोसेफ चंद्रा म्हणाले, “आम्ही टमाट्यांची विक्री किंमत ९० रुपये प्रति किलो ठरवली आहे, तर खरेदीचा दर १२०-१३० रुपये प्रति किलो आहे. यामुळे होणारा तोटा केंद्र सरकार उचलेल.
वेगवेगळ्या प्रदेशांतील हंगामानुसार उत्पादनाचे प्रमाण कमी-जास्त राहते. देशातील बहुतांश भागात टोमॅटोंचे जास्तीत जास्त उत्पादन डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान होते. जुलै-ऑगस्ट आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टोमॅटोंचे उत्पादन कमी होते. जुलैमध्ये पावसाळा सुरू झाल्याने टोमॅटोंचे उत्पादन घटून भाव वाढतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community