NCERT आता शिकवणार रामायण-महाभारत; उच्चस्तरीय समितीचा प्रस्ताव

नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) च्या शालेय इतिहासाच्या अभ्यासक्रमात हे भारतीय शास्त्रीय कालखंडाच्या श्रेणीमध्ये ठेवता येऊ शकतात. रामायण-महाभारताचा अध्याय कोणत्या वर्गात शिकवला जाईल, हे अद्याप ठरलेले नाही.

143
NCERT आता शिकवणार रामायण-महाभारत; उच्चस्तरीय समितीचा प्रस्ताव
NCERT आता शिकवणार रामायण-महाभारत; उच्चस्तरीय समितीचा प्रस्ताव

NCERTच्या उच्चस्तरीय समितीच्या सामाजिक विज्ञान समितीने अभ्यासक्रमात रामायण आणि महाभारत या भारतीय महाकाव्यांचा समावेश  करण्याची शिफारस केली आहे. नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग (NCERT) च्या शालेय इतिहासाच्या अभ्यासक्रमात हे भारतीय शास्त्रीय कालखंडाच्या श्रेणीमध्ये ठेवता येऊ शकतात. रामायण-महाभारताचा अध्याय कोणत्या वर्गात शिकवला जाईल, हे अद्याप ठरलेले नाही.

वेद आणि आयुर्वेद यांचाही समावेश करण्याची शिफारस

शाळांमध्ये या विषयाचा अभ्यासक्रम पुन्हा ठरवण्यासाठी NCERT ची सामाजिक विज्ञान समिती स्थापन करण्यात आली आहे. भारतीय ज्ञानप्रणाली तयार करावी, असा प्रस्तावही समितीने मांडला आहे. वेद आणि आयुर्वेद यांचाही ग्रंथात समावेश करावा.

(हेही वाचा – MLA disqualification case : ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून वैयक्तिक टीका; विधानसभा अध्यक्ष नाराज)

इतिहासाचे निवृत्त प्राध्यापक  प्रो. सीआय इसाक यांनी सांगितले की, समितीने शाळेच्या प्रत्येक वर्गात संविधानाची प्रस्तावना भिंतीवर लिहावी असाही प्रस्ताव दिला आहे. संविधानाची प्रस्तावना प्रादेशिक भाषेत असावी. हे प्रस्ताव एनसीईआरटीचे नवीन पाठ्यपुस्तक बनवण्यासाठी उपयुक्त ठरतील. या प्रस्तावांना एनसीईआरटीकडून अंतिम मंजुरी मिळणे बाकी आहे. (NCERT)

इतिहासाचा शास्त्रीय कालखंड शिकवण्याची शिफारस

प्रो. इसाक याविषयी बोलतांना म्हणाले की, आम्ही इतिहासाची चार भागांत विभागणी करण्याचे सुचवले आहे. एक – शास्त्रीय कालखंड, दुसरा – मध्ययुगीन काळ, तिसरा – ब्रिटिश काळ आणि चौथा – आधुनिक भारत. आतापर्यंत इतिहास फक्त तीन भागांमध्ये शिकवला जातो – प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत आणि आधुनिक भारत. त्यामुळे शास्त्रीय कालखंडात रामायण आणि महाभारत हे महाकाव्य शिकवण्याचे सुचवले आहे. श्रीराम कोण होते, हे विद्यार्थ्यांना कळले पाहिजे.

(हेही वाचा – SC On Jayakwadi Dam : मराठवाड्याची तहान भागणार; जायकवाडीमध्ये पाणी सोडण्याविषयी सर्वोच्च न्यायालय अनुकूल)

१९ सदस्यांची समिती

एनसीईआरटी नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत आपल्या अभ्यासक्रमात बदल करत असून त्यासाठी १९ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने अभ्यासक्रमातून प्राचीन इतिहास काढून त्यात शास्त्रीय इतिहास आणि हिंदू शूरवीरांच्या विजय कथांचा समावेश करण्याची शिफारसही करण्यात आली आहे.

काही वर्षांपूर्वी एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचा समावेश करण्यासाठी इतिहासप्रेमींनी आंदोलन केले होते. आता होणारा हा पालट स्वीकारार्ह असल्याचे मत व्यक्त होत आहे. (NCERT)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.