ऑफिससाठी ठरवून दिलेल्या वेळेत इमानेइतबारे काम करणा-या कर्मचा-यांना अनेकदा ऑफिसची वेळ संपल्यावर देखील बॉसच्या कटकटीचा सामना करावा लागतो. पण आता या कटकटीला आता कायद्याने चाप बसण्याची शक्यता आहे. संसदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत राईट टू डिस्कनेक्ट विधेयक सादर केले आहे.
कर्मचा-यांना मिळणार दिलासा
ऑफिसमधील कामाचे तास संपल्यानंतर कर्मचा-यांना फोन करणे किंवा त्यांना कामासाठी परत बोलावणे या विरोधात हे विधेयक मांडण्यात आले आहे. त्यामुळे या विधेयकाला जर संसदेत मंजुरी मिळाली तर सर्व कर्मचा-यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
(हेही वाचाः अंडरवर्ल्ड आणि शरद पवारांबाबत काय म्हणाले होते मोदी? पहा व्हिडिओ)
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
कामाची वेळ संपल्यानंतर बॉसकडून किंवा कार्यालयातील कोणत्याही व्यक्तीकडून कर्मचा-याला फोन करता येणार नाही, असे या विधेयकात म्हटले आहे. सध्याच्या काळात अनेक कार्यालये ही डिजीटल सेवा पुरवत आहेत. यासाठी कर्मचारी मोबाईल, लॅपटॉपच्या माध्यमातून अनेकदा वर्क फ्रॉम होम करतात. पण असे करत असताना कर्मचा-यांना काळ-वेळेचे भान राहत नाही. 24 तास सेवा देणा-या अनेक कंपन्यांचे कर्मचारी देखील दिवस-रात्र काम करत असतात. यामुळे कर्मचा-यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत, असे हे विधेयक मांडताना सुप्रिया सुळे यांनी सभागृहात सांगितले. त्यामुळे हे प्रकार टाळण्यासाठी या विधेयकाला मंजुरी मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सुप्रिया सुळेंचा पाठपुरावा
सुप्रिया सुळे यांनी 2019 मध्ये लोकसभेत पहिल्यांदा राईट टू डिस्कनेक्ट विधेयक मांडले होते. त्यानंतर सातत्याने या विधेयकाचा त्या पाठपुरावा करत आहेत. कार्यालयीन वेळेशिवाय कर्मचा-यांना कामासंबंधित फोन कॉल्स आणि इमेल्सना उत्तर देणेही बंधनकारक नसेल असे या विधेयकात म्हटले आहे.
(हेही वाचाः मुंबईकरांनो आरोग्य सांभाळा! येत्या दोन दिवसात ‘या’ भागात वाढणार उकाडा)
Join Our WhatsApp Community