NCRTC Recruitment 2023: तरुणांनो NCRTC मध्ये नोकरीची संधी; ‘असा’ करा अर्ज

148

आर्किटेक्टमधून पदवी घेतलेल्या उमेदवारांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची उत्तम संधी निर्माण झाली आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाने चीफ आर्किटेक्ट ते जनरल मॅनेजर/ आर्किटेक्ट अशा विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. पदवीसोबतच अर्ज करणा-या उमेदवारांना या क्षेत्रातील काम करण्याचा चांगला अनुभव असणे आवश्यक आहे. निवड झाल्यावर उमेदवारांना मासिक पगार लाखोंमध्ये मिळेल.

‘या’ जागांसाठी भरती

NCRTC मधील या पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे

  • चीफ आर्किटेक्ट- 1 पद
  • जनरल मॅनेजर/आर्किटेक्ट-1 पद
  • एॅडिशनल जनरल मॅनेजर/आर्किटेक्ट-2 पदे
  • सिनियर डिप्टी मॅनेजर/आर्किटेक्ट- 2 पदे
  • डिप्टी जनरल मॅनेजर/ आर्किटेक्ट-2 पदे

‘असा’ करा अर्ज

या पदांसाठी अर्ज केवळ ऑनलाईनच करता येतील. यासाठी तुम्हाला राष्ट्रीय राजधानी क्षेत्र परिवहन महामंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. हे करण्यासाठी NCRTC च्या अधिकृत वेबसाइटचा पत्ता आहे ncrtc.co.in, इतर कोणत्याही माध्यमातून केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही.

( हेही वाचा: आता परदेशात पैसे पाठवणं झालं सोपं; काय आहेत नवीन फीचर्स? )

किती असेल पगार?

या पदांवर निवड केल्यास तुम्हाला चांगला पगार मिळेल. चीफ आर्किटेक्टला 1 लाख 20 हजार रुपये ते 2 लाख 80 हजार रुपये प्रति महिना पगार दिला जाऊ शकतो. तसेच, सर्व पदांचे पगार लाखात आहेत. तुम्ही सूचना तपशीलवार तपासू शकता. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 फेब्रुवारी 2023 आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.