‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेला छेद देणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता! – रमेश शिंदे

143

‘राष्ट्र’ हे धर्म आणि परंपरेशी संबंधित असते. काँग्रेस नेता राहुल गांधी ‘भारत’ हे ‘नेशन’ नसून ‘युनियन ऑफ स्टेट्स’ आहे’, असे सांगून एक ‘नैरेटिव’ तयार करत आहेत. ते भारत हे ‘राष्ट्र’ नाहीच असे सांगून भारत हे ‘हिंदु राष्ट्र’ आहे, या संकल्पनेलाच छेद देत आहेत. अशा प्रकारे ‘वॉर ऑफ नैरेटिव’ आरंभले आहे. अशी अनेकांकडून हिंदुविरोधी ‘नैरेटिव’ तयार करण्याची षड्यंत्रेही सुरूच आहेत. भारताच्या ‘वसुधैव कुटुंबकम्’ या संकल्पनेला तोडण्याचे काम चालू आहे. वैचारिक माध्यमातून हिंदु राष्ट्र संकल्पनेला छेद देणाऱ्यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ता रमेश शिंदे यांनी केले. मुलुंड (प.) येथील पद्मावती बँक्वेट सभागृह येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या दोन दिवसीय प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात ते बोलत होते. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील अधिवक्ता, उद्योजक, डॉक्टर, माहिती-अधिकार कार्यकर्ते, विविध संप्रदाय, मंडळे यांचे प्रतिनिधी यांसह विविध संघटनांचे शेकडो हिंदुत्वनिष्ठ येथे सहभागी झाले होते.

अमली पदार्थांविषयी कठोर कायदे करा – अॅड. घनश्याम उपाध्याय

रामराज्यात धर्मपालन करणारी आणि चारित्र्यवान प्रजा होती. आता सध्याच्या कलियुगात हिंदू समाजाच्या अधःपतनाचे मूळ अंमली पदार्थांच्या अधीन झालेल्या जिहादी प्रवृत्तीच्या सिनेसृष्टीमध्ये आहे. सध्याच्या पिढीचे आदर्श सिनेसृष्टीतील अभिनेते, अभिनेत्री हे झालेले आहेत. समाजावर बॉलीवूडचा इतका परिणाम झाला आहे की समाज सुद्धा व्यसनाधीन झाला आहे. चारित्र्यवान समाज निर्माण करण्यासाठी अंमली पदार्थांविषयी कठोर कायदे करण्याची आवश्यकता आहे, असे अॅड. घनश्याम उपाध्याय म्हणाले.

(हेही वाचा राज्यातील तहसीलदार, नायब तहसीलदारांचे कामबंद आंदोलन! वाढीव वेतनासाठी २८०० अधिकारी संपावर)

वीर सावरकरांनी क्षमा मागितल्याचा प्रचार करणे विकृती – दुर्गेश परुळकर

वीर सावरकर यांनी क्षमा मागितली, असा अपप्रचार करण्याचा विकृतपणा केला जात आहे. वीर सावरकर यांनी क्षमा मागितली असती, तर त्यांना स्थानबद्ध केले नसते. त्यामुळे त्यांनी कारागृहातून सुटण्यासाठी दिलेले पत्र हे क्षमा पत्र नव्हते. त्यांनी क्षमा मागितली हे पुराव्यावरून टिकत नाही. वीर सावरकरांवरील गांधी हत्येत सहभागी असल्याचा आरोपही दिशाभूल करणारा आहे. कारण यासाठी विरोधक ज्या कपूर समितीच्या अहवाल पुढे करतात, त्या अहवालात असे कुठेही म्हटले नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

या अधिवेशनात ‘गड-दुर्गांवर झालेले अतिक्रमण व त्यांचे संवर्धन’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. यामध्ये गड-दुर्ग रक्षणासाठी एकत्रितपणे करण्यात येणाऱ्या कृती-कार्यक्रमांविषयी पुढील आगामी नियोजनही ठरवण्यात आले. याप्रमाणेच ‘मंदिरांचे सुप्रबंधन’ या विषयावरही परिसंवाद घेण्यात आला. या अधिवेशनात विविध सत्रांत अनेक मान्यवर वक्त्यांनी प्रबोधन केले तसेच येथे आयोजित केलेल्या गटचर्चेत राष्ट्र व धर्मकार्य करतांना येणार्या समस्यांवर उपाययोजनेविषयी हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमींना अवगत करण्यात आले. लोककल्याणकारी हिंदु राष्ट्रासाठी झोकून देऊन संघटितपणे कार्य करण्याचा सर्वांनी निर्धार व्यक्त केला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.