नीट परीक्षा सध्या रद्द केली जाणार नाही. UGC NET परीक्षेतील अनियमिततेची माहिती काल दुपारी मिळाली. सरकार एक उच्चस्तरीय समिती स्थापन करणार आहे, जी या प्रकरणी तुटी सुधारण्यासाठी काम करेल, असे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
काय म्हणाले धर्मेंद्र प्रधान?
पारदर्शकतेशी आम्ही तडजोड करणार नाही, विद्यार्थ्यांचे कल्याण हे आमचे प्राधान्य आहे. त्याच्याशी कोणत्याही किंमतीत तडजोड केली जाणार नाही. NEET परीक्षेबाबत आम्ही बिहार सरकारच्या सतत संपर्कात आहोत. पाटणाहूनही काही माहिती आमच्याकडे येत आहे. पाटणा पोलीस या घटनेच्या तळापर्यंत पोहोचत असल्याची चर्चा आजही रंगली आहे. सविस्तर अहवाल लवकरच भारत सरकारला पाठवला जाईल. ते म्हणाले, “एकदा ठोस माहिती आल्यावर, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. एनटीए असो किंवा एनटीएमधील कोणतीही मोठी व्यक्ती, यामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे शिक्षणमंत्री प्रधान म्हणाले.
(हेही वाचा महाडमध्ये गोरक्षकांना मारहाण; पोलिसांची निष्क्रियता; आमदार Nitesh Rane यांनी थेट दिला इशारा; म्हणाले…)
राजकारण करू नका
धर्मेंद्र प्रधान पुढे म्हणाले, “आम्ही शून्य त्रुटी चाचणीसाठी वचनबद्ध आहोत. मी विरोधी पक्षांना आवाहन करतो की, यावर राजकारण करू नका. मी विद्यार्थ्यांच्या थेट संपर्कात आहे. विद्यार्थ्यांचा संताप रास्त आहे. डार्क नेटवरील UGC-NET ची प्रश्नपत्रिका UGC NET च्या मूळ प्रश्नपत्रिकेशी जुळत असल्याचे स्पष्ट होताच, आम्ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला.