राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने नीट परीक्षेचा प्राथमिक निकाल ३० ऑगस्टला तर अंतिम निकाल ७ सप्टेंबर रोजी जाहीर होण्याबाबतची सूचना संकेतस्थळाद्वारे दिली आहे. १७ जुलै रोजी नीट परीक्षा झाली होती. देशातील एकूण १८ लाख ७२ हजार ३२९ विद्यार्थ्यांनी ही नीट परीक्षा दिली आहे. यापैकी १० लाख ६४ हजार इतकी विद्यार्थिंनींची संख्या आहे.
( हेही वाचा : गणपती मंडळ स्पर्धा : सरकारकडून बक्षिसांचा वर्षाव; प्रत्येक जिल्ह्यातून निवडली जाणार ३६ मंडळे)
या वेबसाईटवर पहा ऑनलाईन निकाल
यावर्षी पहिल्यांदाच देशभरातील १८ लाखाहून जास्त विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा दिली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नीट परीक्षेसाठी बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये २.५ लाख विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. परीक्षेचा निकाल neet.nta.nic.in यावर ऑनलाइन पाहू शकता. सीट नंबर आणि दिलेली माहिती अपलोड केल्यानंतर निकाल पाहता येईल.
विद्यार्थ्यांना दिलेल्या ईमेल आयडीवर OMR शीट्स रिलिझ करण्याबाबत अपडेट मिळेल. उत्तरपत्रिका जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यावर आक्षेप घ्यायचा असेल तर संधी दिली जाणार आहे. यानंतर अंतिम निकाल ७ सप्टेंबरपर्यंत येईल अशी माहिती मिळाली आहे.
Join Our WhatsApp Community