NEET UG-2022 परीक्षेचा निकाल जाहीर; राज्यातील इतके विद्यार्थी उत्तीर्ण

वैद्यकीय क्षेत्रातील प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या नीट युजी- 2022 ( NEET UG-2022) या परीक्षेचा निकाल बुधवारी रात्री उशिरा जाहीर झाला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने हा निकाल जाहीर केला आहे. या निकालामध्ये राजस्थानच्या तनिष्काने अव्वल क्रमांक पटकावला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 9.93 लाखांहून अधिक आहे. यात महाराष्ट्रातील 1 लाख 13 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जुलैमध्ये झालेल्या परीक्षेच्या निकालाकडे देशातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते.

परीक्षेला एकूण 17.64 लाख विद्यार्थी बसले होते. त्यामध्ये दिल्लीच्या वत्स आशिष बत्रा आणि कर्नाटकच्या ह्रषीकेश नागभूषण गांगुले यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकावला आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची सर्वाधिक संख्या उत्तर प्रदेशमध्ये आहे. उत्तर प्रदेशमधून 1.17 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यानंतर महाराष्ट्रातून 1.13 लाख आणि राजस्थानमधून 82 हजार 548 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 17 जुलै रोजी देशभरातील 497 शहरांमध्ये आणि भारताबाहेरील 14 शहरांमधील 3 हजार 570 विविध केंद्रांवर नीट युजीसी परीक्षा झाली होती. या वैद्यकीय प्रवेश परीक्षेला चांगला प्रतिसाद लाभला होता.

( हेही वाचा: नरेंद्र मोदी मोठे नेते, बरोबरी होऊ शकत नाही! बावनकुळेंचा शरद पवारांना इशारा  )

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here