मेडिकल प्रवेशासाठी घेण्यात येणा-या नीट-2023 (NEET-UG Exam 2023) राष्ट्रीय पात्रता सह- प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. 7 मे 2023 रोजी नीट यूजी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रियेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.
नीट यूजी परीक्षेची तारीख लवकर जाहीर केल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तयारीसाठी अधिक वेळ मिळणार आहे. नीटसोबतच NTA ने अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा JEE Main आणि विद्यापीठ प्रवेश परीक्षा CUET UG चे वेळापत्रक देखील जाहीर केले आहे. JEE Main सत्र 1 ची परीक्षा जानेवारी आणि सत्र 2 ची परीक्षा एप्रिल महिन्यामध्ये होईल. तसेच, CUET मे- जून महिन्यात घेणार आहे.
( हेही वाचा: JEE Main 2023 परीक्षा जानेवारीत: ‘असा’ करा अर्ज; ‘या’ आहेत महत्त्वाच्या तारखा )
‘हे’ विद्यार्थी नीट परीक्षेला बसण्यासाठी पात्र
नीट यूजी NEET UG परीक्षा नमुना, अभ्यासक्रम, अर्ज तपशील आणि पात्रता निकष, इतर माहितीसह संपूर्ण तपशील NTA कडून अधिसूचनेद्वारे जारी करण्यात येईल. NEET UG परीक्षेत बसण्यासाठी किमान वयोमर्यादा 17 वर्षे असणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून इयत्ता 12 वी किंवा संबंधित विभागातील परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी नीट परीक्षेला बसण्यास पात्र आहे. याशिवाय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात गणित किंवा इंग्रजीसह भौतिकशास्त्र,रसायनशास्त्र, जीवशास्त्र/जैव तंत्रज्ञान आणि इतर कोणत्याही पर्यायी विषयांचा समावेश असावा.
Join Our WhatsApp Community