मुंबई महापालिकेच्या मंड्यांमध्ये बाजार विभागाचे लक्ष नसून या विभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक मंड्यांमध्ये अस्वच्छता आणि अतिक्रमण वाढत चालले आहे. महापालिकेच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गाळेधारकांनी अतिक्रमण केल्याने खरेदी करता येणाऱ्या ग्राहकांना चालणेही मुश्किल होऊन बसले आहे. या अतिक्रमणामुळे एखादी आगीसारखी दुर्घटना घडल्यास खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना बाहेर पडणेही कठीण होणार आहे. शिवाय या मंडईत अस्वच्छता असून या मंडईच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर बाजार विभागाचे कार्यालय असूनही या विभागातील अधिकाऱ्यांची भीती या गाळेधारकांना नसल्याने हा प्रकार म्हणजे महापालिकेच्या दिव्याखालीच अंधार असल्याचे स्पष्ट होत आहे.
मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट हे सर्वात मोठे होलसेल आणि महत्त्वाचं असे महापालिकेच्या मार्केट असून याठिकाणी खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खरेदीदार येत असतात. या मार्केटची इमारत ही हेरिटेज वास्तु असल्याने या मार्केटच्या वास्तूची पुनर्रचना करण्यात आली आहे. तर, विस्तारित मोकळ्या जागेवर पुनर्विकासाचे काम सुरू आहे. मात्र, हेरिटेज वास्तूमध्ये गाळेधारकांना महापालिकेने नियोजनबद्ध असे बांधकाम करून दिले आहे.
प्रत्येक गाळेधारकाला समान आकाराचा गाला उपलब्ध करून देत प्रत्येक लेन मधील दोन गाळ्यांच्यामध्ये खरेदी करता येणाऱ्या लोकांसाठी सुमारे आठ फुटाची जागा राखीव ठेवली आहे. परंतु या आठ फुटाच्या जागेमध्ये प्रत्येक दुकानदारांनी अतिक्रमण करत दोन्ही बाजूंनी समोरासमोरील गाळेधारकांनी प्रत्येकी अडीच ते तीन फुटांची जागा अडवली आहे. परिणामी खरेदी करता येणाऱ्या लोकांना उभे राहिल्यानंतर तिथून अन्य लोकांना पुढे जाताच येत नाही. त्यामुळे याठिकाणी खरेदी करता येणाऱ्या ग्राहकांना नाहकपणे गर्दीचा सामना करावा लागतो. मात्र, या गाळेधारकांच्या अतिक्रमणाकडे मुंबई महापालिकेच्या बाजार विभागाचे लक्ष दिसून येत नाही.
(हेही वाचा – 10th, 12th Exam Date : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! दहावी – बारावी परीक्षेची तारीख ठरली)
महत्वाचे म्हणजे बाजार विभागाचे कार्यालय याच इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर असून तिथे खुद्द तिथे या खात्याचे सहाय्यक आयुक्त आणि त्यांचे अधिकारी बसतात. केवळ अतिक्रमणच नाही तर हेरिटेज वास्तूमध्ये अस्वच्छता मोठया प्रमाणात पसरलेली दिसून येते. अनेक ठिकाणी कचरा आणि थुंकून ठेवले आहे. विशेष म्हणजे ही वास्तू हेरिटेज असल्याने याठिकाणी हे मोठे मार्केट आणि हेरिटेज वास्तु पाहण्यासाठी विदेशी पर्यटक या मार्केटला भेट देण्यासाठी येत असतात. मात्र या मार्केटमध्ये अस्वच्छता आणि अतिक्रमण यामुळे मार्केट मधील बकालतेचे दर्शन त्यांना घडत असते. आणि येथील अस्वच्छ आणि गर्दीचे ठिकाण असल्याचे व्हिडिओ वव छायाचित्र बनवून परदेशात आपल्या या मार्केटचे खरे चित्र दाखवतात. मात्र बाजार विभागाल या मंडईतील दुकाने सुरक्षित अंतर राखून स्वच्छ व सुंदर राखण्याचा प्रयत्न करावा असे वाटत नाही. त्यामुळे ज्या मार्केटमध्ये बाजार विभागाचे सहाय्यक आयुक्त बसतात, त्यांनाच या मंडईतील अतिक्रमण आणि स्वच्छता राखता येत नाही ते महापालिकेच्या इतर मंडईंमध्ये काय स्वच्छता राखणार आणि बकालपणा काय रोखणार असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community