Nepal flood: नेपाळ पुरामुळे उध्वस्त! आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू, शंभरहून अधिक बेपत्ता

45
Nepal flood: नेपाळ पुरामुळे उध्वस्त! आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू, शंभरहून अधिक बेपत्ता
Nepal flood: नेपाळ पुरामुळे उध्वस्त! आतापर्यंत ११२ जणांचा मृत्यू, शंभरहून अधिक बेपत्ता

नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे (Nepal flood) आतापर्यंत 112 जणांचा मृत्यू झाला आहे. पूर आणि भूस्खलनामुळे शंभरहून अधिक लोक बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. राजधानी काठमांडू आणि आसपासच्या परिसरात सर्वाधिक विध्वंस पाहायला मिळत आहे. काठमांडूचा बहुतांश भाग पाण्याखाली गेला आहे. येथे सर्वाधिक जीवित व वित्तहानी झाली आहे.

विमानतळ बंद, इंटरनेट सेवा विस्कळीत, वीजपुरवठा खंडित
काठमांडूचा इतर आसपासच्या जिल्ह्यांशी संपर्क तुटला आहे. सततच्या पावसामुळे काठमांडूसह देशभरातील विमानतळ बंद करण्यात आले आहेत. पावसामुळे विद्युत खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून इंटरनेट सेवाही विस्कळीत झाली आहे. नेपाळमध्ये 323 मिमी विक्रमी पावसामुळे गेल्या 24 तासांत 100 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 100 हून अधिक लोक बेपत्ता झाल्याची नोंद आहे. पुरामुळे शेकडो लोक जखमी झाल्याची माहिती गृह मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. (Nepal flood)

४८ महामार्ग पूर्णपणे बंद
डोंगराळ भागात भूस्खलनामुळे देशातील ४८ महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. काठमांडूला जोडणारे सर्व महामार्ग आणि इतर रस्ते भूस्खलनामुळे बंद आहेत. देशातील अनेक जिल्ह्यांचा काठमांडूशी कोणत्याही माध्यमातून संपर्क तुटला आहे. शुक्रवारी सायंकाळपासून अनेक प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस ठिकठिकाणी अडकून पडल्या आहेत. दरड कोसळून काही प्रवासी बसेसना आपला जीव गमवावा लागला आहे. शनिवारी सायंकाळी अशा दोन बसेस आढळून आल्यानंतर त्यामधून 14 मृतदेह बाहेर काढण्यात आले. (Nepal flood)

काठमांडू विमानतळावरून अंतर्गत उड्डाणांना बंदी
काठमांडू विमानतळावरून अंतर्गत उड्डाणांना बंदी घालण्यात आली आहे. खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे शनिवारी बहुतेक आंतरराष्ट्रीय विमानसेवा भारताकडे वळवण्यात आल्या होत्या. रविवारी सकाळी टेकऑफ झालेल्या काही विमानांचे प्रवासी विमानतळावर पोहोचू शकले नाहीत. गोरखा येथून दोन दिवसांपूर्वी काठमांडूला निघालेल्या दोन बसेसचा पत्ता लागलेला नाही. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सततच्या पावसामुळे आणि पुरामुळे देशभरातील 15 मोठे पूल कोसळले आहेत. यामध्ये नेपाळ आणि चीनला जोडणाऱ्या दोन बेली पुलांचाही समावेश आहे. (Nepal flood)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.