Nepal : एकेकाळी हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये मुसलमानांचे हिंदूंवर आक्रमण; ‘या’ शहरात लॉकडाऊन

एकेकाळी हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये हिंदूंना पाठलाग करून मारले जात आहे.

119
Nepal : एकेकाळी हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये मुसलमानांचे हिंदूंवर आक्रमण; 'या' शहरात लॉकडाऊन
Nepal : एकेकाळी हिंदु राष्ट्र असलेल्या नेपाळमध्ये मुसलमानांचे हिंदूंवर आक्रमण; 'या' शहरात लॉकडाऊन

नेपाळ गेल्या काही दिवसांपासून धगधगत आहे. (Nepal) नेपाळमध्ये पहिल्यांदाच हिंदूंचा पाठलाग करून त्यांना मारहाण करण्यात आली. हिंदूंवर दगडफेक करण्यात आली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अनिश्चित काळासाठी संचारबंदी लावावी लागली, असे वृत्त नेपाळमधील स्थानिक न्यूज एजन्सी एपीने दिले आहे. (Nepal)

(हेही वाचा – MLA Disqualification Case : महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची सुनावणी चौथ्यांदा लांबणीवर)

परिस्थिती तणावपूर्ण पण नियंत्रणात

नेपाळगंजमधील हिंदू मुलाने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टवरून वाद निर्माण करून मुसलमानांनी हिंदूंना मारहाण केली. याला प्रत्युत्तर म्हणून ३ ऑक्टोबर रोजी हजारो हिंदूंनी रस्त्यावर शांतता मिरवणूक काढली; मात्र त्याचे चकमकीत रुपांतर होऊन रक्तरंजित हिंसाचार करण्यात आला. रस्त्यावर टायर जाळून वाहतूक कोंडी करून हिंदूंना धडा शिकवण्याच्या धमक्या देण्यात आल्या. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वेगाने वाढणाऱ्या तणावादरम्यान नैऋत्य नेपाळच्या नेपाळगंज  शहरात संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. संचारबंदीनंतर परिस्थिती तणावपूर्ण असली, तरी नियंत्रणात आहे.  (Nepal)

रॅलीवर दगडफेक

मुसलमानांनी हिंदूंच्या रॅलीवर दगड आणि बाटल्या फेकण्यात आल्या. यामुळे मोठ्या प्रमाणात हिंसाचार होऊन शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. आजही तिथली ८० टक्के लोकसंख्या हिंदू आहे, तरीही पहिल्यांदाच तिथे हिंदू समाजातील लोकांचा पाठलाग करून त्यांना मारहाण करण्यात आली. (Nepal)

हिंसाचाराच्या छायाचित्रांमध्ये दंगलखोर छतावरून हिंदूंवर दगडफेक करत आहेत, हे दिसून येते. हिंदू समाजातील लोकांनी भगवा घेतला आहे. ते पळून जाण्यासाठी धावत आहेत. छतावरून त्यांच्यावर दगडफेक केली जात आहे, अशी छायाचित्रे प्रसारित होत आहेत. सामाजिक आणि धार्मिक सलोखा राखण्यासाठी सहकार्य करावे, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट शेअर करू नयेत, असे आवाहन नेपाळमधील स्थानिक प्रशासनाने केले आहे.

उत्तर प्रदेशात सतर्कतेचा इशारा

नेपाळमधील या घटनेनंतर उत्तर प्रदेशच्या लगतच्या भागात सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. काठमांडूपासून 400 किमी अंतरावर असलेल्या नेपाळगंजमध्ये झालेल्या जातीय हिंसाचारात 5 सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सुमारे 25 जण जखमी झाले आहेत. या संघर्षानंतर प्रशासनाला तेथे अनिश्चित काळासाठी संचारबंदी लागू करावी लागली. नेपाळगंज शहराची सीमा भारतातील उत्तर प्रदेशला लागून आहे.

नेपाळ हे एकेकाळी हिंदु राष्ट्र होते. भारत आणि नेपाळचे संबंध शतकानुशतके जुने नसून अनेक जुने आहेत. आजही दोन्ही देशांमध्ये रोटी-बेटीचे नाते आहे. असे असूनही काही अतिरेकी आणि कट्टरतावाद्यांनी देशातील वातावरण गढूळ केले आहे. नेपाळमध्ये हिंदूंवर मोठ्या प्रमाणात हल्ले करण्यात येत आहेत. नेपाळगंजमध्ये रक्तरंजित हिंसाचारानंतर शहरात लॉकडाऊन लागू करावा लागला आहे. (Nepal)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.