भारत-नेपाळ सीमेवर भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्याची तीव्रता 6.1 इतकी होती. (Earthquake In Nepal) नेपाळच्या राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, रविवारी नेपाळमध्ये 6.1 रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यात म्हटले आहे की, भूकंपाचे केंद्र काठमांडूच्या पश्चिमेला सुमारे 55 किमी (35 मैल) धाडिंग येथे होते. धाडिंग जिल्ह्यातील सर्वांत वरिष्ठ अधिकारी बद्रीनाथ गारे यांनी रॉयटर्सला सांगितले, “आम्हाला खूप जोरदार हादरे जाणवले. काही रहिवासी त्यांच्या घरातून बाहेर आले. आतापर्यंत कोणत्याही दुखापतीचे वृत्त नाही.” (Earthquake In Nepal)
(हेही वाचा – PMPML : पुण्यात पुन्हा एकदा संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती; वाहनचालकाशी वाद झाल्याचे क्षुल्लक कारण)
दिल्ली-एनसीआरपर्यंत भूकंपाचे धक्के
युरोपीयन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राने सांगितले की, भूकंपाचा केंद्रबिंदू 13 किमी (8.1 मैल) खोलीवर होता. बागमती आणि गंडकी प्रांतातील इतर जिल्ह्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. भारतातील दिल्ली-एनसीआर भागातही भूकंपाचे धक्के जाणवले. आठवडाभरापूर्वी दिल्ली-एनसीआर, नोएडा आणि गाझियाबादमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. हरियाणामध्येही अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. यापूर्वी 3 ऑक्टोबर रोजी राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. भूकंपाची तीव्रता इतकी होती की, लोक घराबाहेर पडले आणि रस्त्यावर आले. या भूकंपात कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, दिल्ली-एनसीआरमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता 3.1 इतकी होती. (Earthquake In Nepal)
भूकंप का होतात ?
पृथ्वीचा वरचा पृष्ठभाग सात टेक्टोनिक प्लेट्सपासून बनलेला आहे. या प्लेट्स जिथे जिथे एकमेकांवर आदळतात, तिथे भूकंपाचा धोका असतो. जेव्हा या प्लेट्स एकमेकांच्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा भूकंप होतो, प्लेट्स एकमेकांवर घासतात, त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते आणि त्या घर्षणामुळे वरची जमीन थरथरू लागते. (Earthquake In Nepal)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community