Net Worth of Reliance : रिलायन्सचं एकूण बाजारमूल्य किती? मुकेश अंबानींना किती पगार मिळतो?

Net Worth of Reliance : ५जी साठीचा लिलाव सुरू झाल्यामुळे रिलायन्स जिओच्या मूल्यात वाढ झाली आहे.

124
Net Worth of Reliance : रिलायन्सचं एकूण बाजारमूल्य किती? मुकेश अंबानींना किती पगार मिळतो?
  • ऋजुता लुकतुके

फोर्ब्सच्या यादीनुसार, रिलायन्स कंपनीचं भागभांडवल किंवा बाजारमूल्य या घडीला २५३.९० अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात आहे. मूल्यांकनाच्या आधारावर रिलायन्स ही जगातील चाळीसावी मोठी कंपनी आहे. कंपनीचा एकूण महसूल हा १०८ अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात आहे. तर कंपनीचे संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मुकेश अंबानी यांची एकूण मालमत्ता ही फोर्ब्सच्या यादीनुसार या घडीला १२१.१ अब्ज अमेरिकन डॉलर इतकी आहे. गंमत म्हणजे रिलायन्सची एकूण मालमत्ता ही भारतातील सरकारी कंपन्यांच्या मिळून एकूण मालमत्तेपेक्षाही जास्त आहे. (Net Worth of Reliance)

देशातील सर्वात मौल्यवान कंपनी असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी वडील धीरुभाई अंबानींकडून वारशात मिळालेल्या पेट्रोकेमिकल उद्योगात नवीन शिखरं पादाक्रांत करत मागच्या दहा वर्षांत कंपनीचा विस्तार १०० टक्क्यांहून मूल्यवृद्धी शक्य केली आहे. आज, रिलायन्सचा व्यवसाय रिटेल आणि फायनान्ससह सर्व क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे आणि मार्केट कॅपच्या बाबतीत, मोठ्या कंपन्या मागे आहेत. त्यांनी शिक्षण सोडून वडिलांच्या व्यवसायात प्रवेश केला आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी रिलायन्सची सूत्रे हाती घेतली आणि तिला खूप उंचीवर नेले. आज रिलायन्स मार्केट कॅप १९.७९ लाख कोटी रुपये आहे आणि त्याने २० लाख कोटी रुपयांचा आकडाही ओलांडला आहे. ज्या वेगाने कंपनीचा विस्तार झाला, मुकेश अंबानी यांनी संपत्ती आणि समृद्धीच्या बाबतीत सर्वांना मागे सोडले. (Net Worth of Reliance)

(हेही वाचा – Death of Young Badminton Player : युवा बॅडमिंटनपटूच्या मृत्यूची बॅडमिंटन संघटना करणार चौकशी)

रिलायन्स इंडस्ट्रीजचे आहे इतके बाजारमूल्य 

विभाजनात, अनिल अंबानींना रिलायन्स समूहाचे बहुतेक नवीन व्यवसाय मिळाले, तर मुकेश अंबानींना जुन्या व्यवसायावर समाधान मानावे लागले. पण एकीकडे अनिल अंबानींच्या कंपन्या घाई आणि कर्जाच्या ओझ्याखाली डबघाईला येऊ लागल्या, तर दुसरीकडे मुकेश अंबानींनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा ताबा घेतला आणि पुढे नेत राहिले. मुकेश अंबानी यांनी २००२ मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजची जबाबदारी स्वीकारली तेव्हा त्याचे बाजार भांडवल फक्त ७५,००० कोटी रुपये होते. यानंतर त्यांनी आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील सर्वात मोठी कंपनी बनवली आणि तिचे बाजारमूल्य २० लाख कोटी रुपयांवर पोहोचले. (Net Worth of Reliance)

रिलायन्स इंडस्ट्रीजची सूत्रे हाती घेतल्यानंतर मुकेश अंबानी यांनी केवळ पेट्रोलियमच नव्हे तर रिटेल, लाइफ सायन्सेस, लॉजिस्टिक, टेलिकॉम आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रातही जोरदार प्रभाव पाडला. त्यांची रिलायन्स रिटेल ही भारतातील सर्वात मोठी किरकोळ व्यवसाय कंपनी आहे आणि तिचा पोर्टफोलिओ सतत विस्तारत आहे. याशिवाय २०१६ मध्ये अंबानींनी लॉन्च केलेली रिलायन्स जिओ या क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून उदयास आली. आता ५जी स्पेक्ट्रम लिलावानंतर रिलायन्स जिओचं बाजारमूल्य वाढलं आहे आणि त्याचाही फायदा रिलायन्स कंपनीला मिळणार आहे. (Net Worth of Reliance)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.