Corona update : देशात कोरोनाच्या ३०५ नवीन रुग्णांची नोंद

देशात गुरुवारी ३०५ नवीन रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे

238
Corona update : देशात कोरोनाच्या ३०५ नवीन रुग्णांची नोंद

भारतात (India) पुन्हा एकदा कोरोनाचा (Corona) संसर्ग झपाट्याने पसरू लागला आहे. देशात गुरुवारी (१८ जानेवारी)  ३०५ नवीन रुग्ण आढळल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. कोविड-19 ची नवीन प्रकरणे दररोज समोर येत आहेत. तथापि, या कालावधीत सक्रिय प्रकरणांच्या संख्येतही घट दिसून आली आहे. (Corona update)

गेल्या २४ तासांत कोरोनामुळे ३ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात ५ डिसेंबरपर्यंत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट झाली होती, परंतु नवीन प्रकारांचे आगमन आणि वाढत्या थंडीमुळे कोविड -19 च्या प्रकरणांमध्ये पुन्हा एकदा झपाट्याने वाढ झाल्याचे दिसून आले आहे.आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सक्रिय रुग्णांची संख्या आता २४३९ वर आहे. (Corona update)

(हेही वाचा : PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध केली राम मंदिरावर आधारित टपाल तिकिटे)

कोरोनाच्या सक्रिय प्रकरणांपैकी ९२ टक्के रुग्ण होम आयसोलेशनमध्ये बरे झाले आहेत. यासोबातच कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन-1च्या प्रादुर्भावाचा वेग काहीसा मंदावल्याचे दिसून आले. आरोग्य मंत्रालयाच्या माहिती नुसार, या आजारातून बरे झालेल्या लोकांची संख्या४.४ कोटींहून अधिक झाली आहे.

JN -१ ची ही आहेत लक्षणे

JN -१ हा कोरोना विषाणूचा उप प्रकार आहे. सर्दी होणं, नाक गळणे, घसा दुखणे किंवा घसा खवखवणे, ताप येणे, डोकंदुखी आणि पोटदुखी, तसेच जुलाब होणे ही JN -१ ची प्रमुख लक्षणे आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.