मालदीवने गरज नसताना उकरून काढलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्या देशाला धडा शिकविण्यासाठी केंद्र सरकारने आता लक्षद्वीप (Lakshadweep) दळणवळण यंत्रणा भक्कम करण्याचा निर्णय घेतला. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून आगामी काळात लक्षद्वीप येथील मिनीकॉय बेटावर नवीन विमानतळ (Air Port) उभारले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तर सध्या या विमानतळाचा वापर लष्करी व व्यावसायिक विमाने उतरविण्यासाठी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. (lakshadweep)
येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी व्यावसायिक विमाने उतरतील, अशा पद्धतीने येथे सोयी सुविधांचा विकास केला जाईल. या प्रस्तावित मिनिकॉय विमानतळामुळे हवाई दल तसेच नौदलाला अरबी समुद्रात संचलन करता येणार आहे.
लढाऊ विमाने, लष्करी वाहतूक विमाने आणि व्यावसायिक विमाने चालविण्यास सक्षम असे संयुक्त हवाई क्षेत्र तयार करण्याची योजना आहे”, असे सूत्रांनी सांगितले.(lakshadweep)
दुहेरी उद्देश डोळ्यासमोर ठेवून विमानतळ उभारले जाणार
येथील पर्यटनाला चलन देण्यासाठी व्यावसायिक विमाने उतरू शकतील असा दुहेरी उद्देश डोळ्यासमोर ठेवून विमानतळ उभारले जाणार आहे. हे विमानतळ उभारतण्यात आले तर हवाई दलाला मालदीव सोबतच हिंद महासागरातील हालचालींवर देखील लक्ष ठेवता येऊ शकेल. सध्या या विमान तालाच्या उभारणीचा प्रस्ताव सरकारी दरबारी प्रलंबित आहे. या विमानतळामुळे चीनच्या सागरी हालचालींवरही लक्ष ठेवता येणार आहे. हे बेट जगातील सर्वात व्यस्त हवाई मार्गांपैकी एक आहे जिथून दररोज सुमारे 300 विमाने जातात.
(हेही वाचा : Phd Fellowship : सारथी, बार्टी आणि महाज्योती चा पीएचडी फेलोशीपचा पेपर फुटला; विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार)
मालदीव विरोधात सोशल मीडियावर संताप
मालदीवच्या विरोधात सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असताना भारताने मिनिकॉय येथे विमानतळाची योजना आखली जातआहे. अनेक नेटकऱ्यांनी प्रवाशांना शेजारच्या दक्षिण आशियाई द्वीपसमूहांऐवजी लक्षद्वीपला भेट देण्याचे आवाहन केले आहे.
काय आहे प्रकरण
गेल्या आठवड्यात मालदीवच्या तीन उपमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरल्याने वाद निर्माण झाला. मोदी यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या लक्षद्वीप दौऱ्याचे फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर त्यांचे विधान आले, त्यानंतर मालदीवच्या तुलनेत भारतीय बेटे अधिक सुंदर आहेत की नाही याबद्दल सोशल मीडियावर चर्चा झाली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community