Ajni Railway Station : नवीन अजनी रेल्वे स्थानकाचे काम प्रगतीपथावर, प्रशासनाने दिली ट्विटरद्वारे माहिती

135
Ajni Railway Station : नवीन अजनी रेल्वे स्थानकाचे काम प्रगतीपथावर, प्रशासनाने दिली ट्विटरद्वारे माहिती
Ajni Railway Station : नवीन अजनी रेल्वे स्थानकाचे काम प्रगतीपथावर, प्रशासनाने दिली ट्विटरद्वारे माहिती

नागपूर शहरातील अजनी रेल्वे स्थानकाचा जागतिक दर्जाच्या स्थानकाच्या यादीत समावेश होणार आहे. आगामी काळात हे स्थानक शहरवासीयांसाठी महत्त्वाचे स्थानक म्हणून उदयास येणार आहे. पुनर्विकासामुळे स्थानकावरील सुविधांमध्येही वाढ होत आहे. लौकिकात भर घालणाऱ्या अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम जोरात सुरू आहे. येथील भू-अन्वेषण आणि तांत्रिक परीक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून आता इतर कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती प्रशासनाने ट्विटरद्वारे दिली आहे.

रेल्वे भूविकास प्राधिकारणामार्फत (RLDA) २१ लिफ्ट, १७एक्सेलेटर, ६ नवीन फूट ओव्हर ब्रिज इत्यादी सुविधा येथे विकसित केल्या जाणार आहेत. जु्न्या शॉर्ट साइडिंग्जचे विघटन आणि पुनर्स्थापना येथे करण्यात आली आहे. येथे ४३२० चौरस मीटरचा ‘रूफ प्लाझा’ बांधण्यात येणार असून, यामध्ये वेटिंग लाउंज, कॅफेटेरिया, रिटेल अशा आधुनिक सुविधा उपलब्ध असतील. या स्थानकावर येण्याचा आणि जाण्याचा मार्ग वेगवेगळा असणार आहे. आता अजनी स्थानकाचे पुनरुज्जीवन झाल्यानंतर दुरांतो एक्स्प्रेससह अनेक महत्त्वाच्या गाड्या येथून धावू शकणार आहेत. याकरिता या स्थानकाचा पुनर्विकास करण्याकरिता ३५९ कोटी , ८२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे.

केंद्रीय विद्यालय अजनी परिसरात वेगवेगळ्या प्रकारचे १२० वृक्ष लावण्यात आले आहेत. या रेल्वे स्थानकाशी मेट्रो स्टेशन, शहर बस व्यवस्थेच्या अन्य साधनांसह मल्टीमॉडल कनेक्टिव्हिटी राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांना जाण्यायेण्यासाठी अधिक सोयीचे होईल. सौर ऊर्जा, जल संरक्षण आणि जल संवर्धनाच्या तरतुदीसोबतच अजनी रेल्वे स्थानकाचा विकास ‘हरित भवन’च्या रुपात केला जाणार आहे.

(हेही वाचा – Ganeshotsav 2023 : मुंबईतील गणेशोत्सवाची क्रेझ गुजरातमध्येही ,रोज येतायेत ६०ते ७० बसेस)

पूर्ण झालेली आणि प्रगतीपथावर असलेली कामे…
माती तपासणी, साइट प्रयोगशाळा, कामगारांची घरे, पीसीसी आणि फाउंडेशन कार्य, स्तंभ कास्टिंग, स्थानकाजवळी इमारतीचे उत्खनन, बॅचिंग प्लांट इंस्टॉलेशन आणि कॅलिब्रेशन, सेफ्टी पार्क, पश्चिमेकडील पार्किंगचा विस्तार…अशी स्थानकावरील अत्याधुनिका कामे आतापर्यंत पूर्ण झाली असून स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूचे पाया काम, वजनकाट्याचे काम, पश्चिमेकडील पायासाठी उत्खनन आणि पसीसीचे काम पूर्ण व्हायचे आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.