झोमॅटोचे (Zomato) सीईओ दीपेंद्र गोयल (CEO Deepender Goyal )यांनी एका फीचरची घोषणा केली आहे. या फिचरचे नाव Food Rescue असं आहे. जर एखाद्या युजर्सने त्याची ऑर्डर कॅन्सल केली तर झोमॅटो त्यांच्या जवळच्या ग्राहकांना ऑफर देईल की ते परवडणाऱ्या दरात ही ऑर्ड घेऊ शकतात. दीपेंद्र गोयल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. झोमॅटोवर आम्ही ऑर्डर कॅन्सल करण्याला प्रोत्साहन देत नाही, कारण यामुळं खूप अन्नाची नासाडी होते. असं ते म्हणाले आहेत. (Zomato)
At a staggering 4 lakh orders a month that get cancelled and potentially wasted, Food Rescue is a functionality worth building.
Great initiative @deepigoyal 👍🏾. https://t.co/i8pBsKjCXd
— guyfromvalley🏕🏔⛷ (@vineetkaul) November 10, 2024
(हेही वाचा-Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांच्या उमेदवारांसाठी मोदी-शाहांची एकही सभा नाही; कारण काय?)
दीपेंद्र गोयल सोशल मिडीया पोस्ट करत म्हणाले की, कठोर नियम आणि कॅन्सलेशन पर नो रिफंड पॉलिसी असतानाही चार लाखाहून जास्त ऑर्डर्स ग्राहकांकडून विविध कारणांसाठी झोमॅटोकडून कॅन्सल करण्यात येतात. आमच्यासाठी, रेस्टॉरंट उद्योगासाठी आणि ऑर्डर रद्द करणाऱ्या ग्राहकांसाठी, आज आम्ही एक नवीन फिचर लाँच करत आहोत. Food Rescue असं या फीचरचे नाव असून हे अद्याप लाँच करण्यात आलेले नाही. (Zomato)
(हेही वाचा-Railway Farishte : मध्य रेल्वेचे ऑपरेशन नन्हे फरिश्ते; ७ महिन्यांत हरवलेली ८६१ बालके पालकांकडे सुपुर्द)
आइस्क्रीम, शेक, स्मूदी आणि नाशवंत वस्तू यासारख्या ऑर्डर या फिचरसाठी पात्र नसतील. त्याच वेळी, रेस्टॉरंट मालकांना पूर्वीप्रमाणेच मूळ रद्द केलेल्या ऑर्डरची भरपाई मिळणे सुरू राहील. यासोबतच नवीन फीचर अंतर्गत ऑर्डर घेतल्यास नवीन ग्राहकाने केलेल्या पेमेंटचा काही भागही मिळेल. (Zomato)
(हेही वाचा-Baba Siddique Murder Case मध्ये मुख्य शूटर्ससह ५ जणांना यूपीतून अटक)
कॅन्सल केलेल्या ऑर्डर्स आता त्याच परिसरात असलेल्या ग्राहकांना दिसणार आहेत. या ऑर्डर्स त्यांना खूप कमी किंमतीत मिळणार आहे. त्यांच्या मूळ पॅकेजिंगसह आणि काही मिनिटांतच ग्राहकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे. रद्द केलेली ऑर्डर ग्राहकांच्या अॅपवर ऑर्डर घेऊन जाणाऱ्या डिलिव्हरी पार्टनरच्या 3 किमीच्या परिघात दिसेल. पण अन्नाचा ताजेपणा सुनिश्चित करण्यासाठी ऑर्डर घेण्याचा पर्याय फक्त काही मिनिटांसाठी उपलब्ध असेल. यावर झोमॅटोला सरकारी कर वगळता कोणताही फायदा होणार नाही. (Zomato)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community