Raste vikas App : ग्रामीण भागातील रस्ते दाखवणारे नवीन ॲप येणार; ठाणे जिल्हा परिषदेचा उपक्रम

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरला जोडणाऱ्या ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील २०३५.२० किमी लांबीच्या रस्त्यावरून प्रवास करताना आता कोणत्या रस्त्यावर खड्डे आहेत किंवा कोणत्या रस्त्यावर अपघात किंवा अन्य कारणामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे याची पूर्वसूचना देणारे ॲप (App) तयार करण्याचा उपक्रम ठाणे जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

224
Raste vikas App : ग्रामीण भागातील रस्ते दाखवणारे नवीन ॲप येणार; ठाणे जिल्हा परिषदेचा उपक्रम
Raste vikas App : ग्रामीण भागातील रस्ते दाखवणारे नवीन ॲप येणार; ठाणे जिल्हा परिषदेचा उपक्रम

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरला जोडणाऱ्या ठाणे जिल्ह्यामधील ग्रामीण भागातील २०३५.२० किमी लांबीच्या रस्त्यावरून प्रवास करताना आता कोणत्या रस्त्यावर खड्डे आहेत किंवा कोणत्या रस्त्यावर अपघात किंवा अन्य कारणामुळे वाहतूक कोंडी झालेली आहे याची पूर्वसूचना देणारे ॲप (App) तयार करण्याचा उपक्रम ठाणे जिल्हा परिषदेने हाती घेतला आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Raste vikas App)

प्रवाशांना मार्गदर्शन करण्याकरिता स्वतंत्र ॲप
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आदि मुंबई महानगरालगत ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग समृद्धी महामार्गासाह अन्य राष्ट्रीय महामार्गाना जोडला जाणार आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या ठेकेदारांकडून ग्रामीण भागतील रस्त्यांकडे दुर्लक्ष केले गेले आहे.चांगल्या रस्त्याअभावी अनेक लोकांचे बळी जातात तसेच प्रसुतीसाठीही जाताना महिलांची अनेकवेळा गैरसोय होते.  रस्त्यांची सध्याची अवस्था सुधारून त्यावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मार्गदर्शन करण्याकरिता स्वतंत्र ॲप तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. (Raste vikas App)

(हेही वाचा : Explosion In Company: नागपूर-अमरावती रोडवरील कंपनीत स्फोट, ५ जणांचा मृत्यू

मागील सहा महिन्यांपासून येथील माहिती संकलन करण्याचे काम करीत आहे. तर लवकरच रस्ते विकास ॲप चा फायनल डेमो घेण्यात येईल मग सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येणार असल्याचे आधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रस्ते विकास ॲप मुळे रस्त्यांवरील वाहतूक कोंडी, अपघात आदींची पूर्वसूचना प्रवाशांना मिळेल. रस्त्यावरील धोकादायक वळणाची माहिती मिळणार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.