Siddhivinayak Trust : सिद्धीविनायक ट्रस्टच्या अधिकारी नंदा राऊत यांच्या जागी नवी नियुक्ती

200
Siddhivinayak Trust : सिद्धीविनायक ट्रस्टच्या अधिकारी नंदा राऊत यांच्या जागी नवी नियुक्ती
Siddhivinayak Trust : सिद्धीविनायक ट्रस्टच्या अधिकारी नंदा राऊत यांच्या जागी नवी नियुक्ती

सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह असतांना प्रभादेवी येथील श्री सिध्दीविनायक ट्रस्टच्या कार्यकारिणीमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. (Siddhivinayak Trust) सध्याच्या कार्यकारी अधिकारी नंदा राऊत यांच्या जागी वीणा मोरे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती मंदिर विश्वस्तांनी दिली आहे. त्यांच्या जागी सध्या शालेय शिक्षण विभागात अपर सचिव पदावर कार्यरत असलेल्या वीणा मोरे पाटील याना आता त्या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. (Siddhivinayak Trust)

(हेही वाचा – Rahul Gandhi : मंदिरातील मूर्तींप्रमाणे शक्तीहीन आहेत संसदेतील खासदार; राहुल गांधींनी दुखावल्या हिंदूंच्या धार्मिक भावना)

नंदा राऊत यांच्यावर मनसे कडून गैरव्यवहाराचे आरोप झाले होते आणि त्यांच्या चौकशीची मागणीही करण्यात आली होती. (Siddhivinayak Trust) त्यानंतर आता ही नवी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टवर अनेक प्रकारचे आरोप झाले होते. कोरोनाच्या काळात मंदिराला मिळालेले 15 हजार लिटर तूप ट्रस्टने विकल्याचा सर्वात मोठा आरोप होता. या आरोपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल, असे सांगितले होते. त्यानंतर श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने कारभारामधील अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले होते. (Siddhivinayak Trust)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.