यंदाच्या आठवड्यात सलग दुस-यांदा नागपूरात ओमायक्रॉन विषाणूच्या बीए व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. राज्यात आता बीए व्हेरिएंटच्या ४ आणि ५ या दोन्ही व्हेरियंटची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या २६ वर पोहोचली आहे.
आरोग्य विभागाची माहिती
नागपूरमधील २७ वर्षांच्या महिलेला १९ जून रोजी कोरोनाची बाधा झाली होती. या रुग्णाला सुरुवातीला कोरोनाची कोणतीही लक्षणे नव्हती. या महिला रुग्णावर अद्यापही कोरोनावर उपचार सुरु असून, घरगुती विलगीकरणात उपचार घेत आहेत. रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे. या महिलेने कोरोनाच्या दोन्ही लशींची मात्रा घेतली असून. राज्यात आतापर्यंत बीए व्हेरिएंटचे पुण्यात १५, मुंबईत ५, नागपूर ४ आणि ठाण्यात २ रुग्ण आढळले आहेत.
( हेही वाचा : कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश! १०० टक्के रिक्त पदे भरण्यास मान्यता)
राज्यात शनिवारी ४ हजार २०५ नव्या कोरोना रुग्णांची संख्या नोंदवली गेली, त्या तुलनेत ३ हजार ७५२ कोरोना रुग्णांना यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. शनिवारी उपचारादम्यान मुंबईत २ तर ठाण्यात एका कोरोना रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता १.८५ टक्क्यांवर नोंदवले जात आहे. तर रुग्ण कोरोनाबाधित होण्याचे प्रमाण ९.७२ टक्क्यांवर पोहोचले आहे.
Join Our WhatsApp Community