रक्त आणि रक्तामधील घटक (रेड सेल) यांच्या दरांमध्ये वाढ होणार असून, सरकारी रक्तपेढीत ५० रुपयांनी, तर खासगी रक्तपेढीत १०० रुपयांनी हे दर वाढणार आहेत. प्लाझ्मा, प्लेटलेट्स यांमध्ये कोणतीही दरवाढ झालेली नाही. रक्त आणि रक्तातील घटकांच्या अतिरिक्त चाचण्यांसाठी लागणाऱ्या प्रक्रिया शुल्कामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून, सन २०१४ मध्ये निश्चित केलेले दर कायम राहणार आहेत.
( हेही वाचा : शरद पवारांचे निकटवर्ती अनिरुद्ध देशपांडेंच्या कार्यालयावर आयकर विभागाची छापेमारी)
रक्ताच्या पिशवीचे नवे दर
सार्वजनिक आरोग्य विभागाने याबाबतचा निर्णय नुकताच जाहीर केला आहे. सरकारी रक्तपेढ्यांमध्ये रक्त आणि रक्तघटकांसाठी ८५० ते १०५० रुपये दर, तर खासगी रक्तपेढीत १,४५० रुपये दर आकारले जातील. रक्तदात्यांकडून रक्ताचे संकलन केल्यावर साठवणूक आणि त्यावर प्रक्रिया करावी लागते. रुग्णाला रक्त देण्यापूर्वी ते पूर्णपणे सुरक्षित आहे की नाही, यासाठी रक्ताच्या विविध आजारांच्या तपासण्या कराव्या लागतात. या सर्व प्रक्रियेसासाठी रक्तपेढ्यांना खर्च येतो. त्यामुळे ही दरवाढ करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय महाविद्यालय संलग्न सरकारी रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांना रक्त व रक्तघटक मोफत उपलब्ध करून देण्याची सवलत सुरूच राहणार आहे.
Join Our WhatsApp Community