मांजरींमुळे वाचलं नाल्यात वाहून जाणारं तान्हबाळ!

एखाद्या माणसानं पाळीव प्राण्याचा जीव वाचवला किंवा त्याला मदत केली, अशा प्रकारचे कित्येक वृत्त आपण माध्यमांमधून ऐकले असेल किंवा पाहिले असेलच. माणसाच्या अशा वृत्तीचं, माणुसकीचं दर्शन होणं स्वाभिवक आहे. मात्र तुम्ही प्राळीव प्राण्यानं माणसाचा जीव वाचवल्याचे ऐकले आहे का? अशीच एक घटना नुकतीच मुंबईतील पंतनगर परिसरातून समोर आली आहे.

(हेही वाचा – मशिदींवर भोंगे कोणत्या कायद्याखाली? उच्च न्यायालयाचा थेट सवाल)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत नवजात अर्भकाला वाचवल्याची घटना समोर आली असून मुंबईतील पंतनगर परिसरात एक नवजात अर्भक नाल्यात वाहून जात होते. पहिल्यांदा त्याला मांजरींनी पाहिले आणि त्यांनी आवाजाने आजूबाजूच्या माणसांना बोलवण्याचा प्रयत्न केला. यानंतर परिसरातील नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. मुंबई पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता घटनास्थळी धाव घेतली. यानंतर नाल्यात फेकलेल्या नवजात अर्भकाला नाल्यातून बाहेर काढले आणि रुग्णालयात त्वरीत दाखल करून त्याचा जीव वाचवला. मुंबई पोलिसांनी यासंदर्भातील एक ट्विट करून या घटनेची माहिती दिली आहे.

असे केले मुंबई पोलिसांनी ट्विट

“एक नवजात अर्भक कपड्यात गुंडाळून नाल्यात फेकले गेले असल्याची माहिती पंतनगर निर्भया पथकाला एका हितचिंतकाकडून मिळाली होती. शेजारच्या मांजरींनी ओरडून गोंधळ केल्याने ती व्यक्ती सावध झाल्याचे समजले. बाळाला त्वरित राजावाडी रुग्णालयात नेले असून बाळ आता सुरक्षित आहे”, असे ट्विट मुंबई पोलिसांनी केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या निर्भया पथकाने वेळीच सतर्कता दाखवत कारवाई केल्याने या तान्ह्याबाळाचा जीव वाचवला आहे. बाळाला राजावाडी रुग्णालयात नेण्यात आल्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या हे तान्हबाळ सुखरूप असून ते धोक्याबाहेर आहे. तसेच या बाळाच्या घऱच्यांची ओळख पटलेली नसून याचा तपास सध्या सुरू आहे. तर मुंबई पोलिसांच्या या कर्तव्यदक्षतेचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here