New Buses Demand: माजी आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, करमाळ्यासाठी ३० नवीन बस देण्याची मागणी

जुन्या बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून माजी आमदार या नवीन बस तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.

145
New Buses Demand: माजी आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, करमाळ्यासाठी ३० नवीन बस देण्याची मागणी
New Buses Demand: माजी आमदारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, करमाळ्यासाठी ३० नवीन बस देण्याची मागणी

करमाळा आगारातील बस जुन्या झाल्या असून, वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एसटी आगारासाठी तातडीने नवीन ३० बसेस (New Buses Demand) उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

करमाळा आगाराकडे बसची संख्या बरीच कमी आहे. त्यातदेखील ज्या बस सध्या चालू स्थितीत आहेत त्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळे त्या वारंवार बंद पडतात. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. जुन्या बसेसमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून माजी आमदार या नवीन बस तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

(हेही वाचा – Ludwig van Beethoven: ‘अमर’ संगीतरचना करणारे जर्मन संगीतकार आणि पियानोवादक )

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.