राज्यात कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद; रूग्णसंख्या पाच हजारांवर

75

राज्यात बुधवारी कोरोना रुग्णसंख्येची विक्रमी नोंद होऊन, एका दिवसांत तब्बल ५ हजार २१८ कोरोना रुग्णांची नोंद राज्यातील विविध भागांत झाली. मुंबईत दर दिवसाला २ हजारांच्या जवळपास कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, तर मुंबई महानगर तसेच राज्यातील प्रमुख शहरांमध्येही शंभर ते चारशेच्या घरात कोरोनाचे नवे रुग्ण दरदिवसाला सापडत आहेत. त्यातुलनेत आता रुग्णांना दर दिवसाला डिस्चार्ज देण्याची संख्या वाढवण्यावर आरोग्य विभागाला यश आले आहे.

( हेही वाचा : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण; ड्युटी शेड्युल बदलण्याची मागणी पूर्ण)

आरोग्य विभागाची माहिती 

एका दिवसांत ५ हजार २१८ नवे कोरोनाचे रुग्ण तर गेल्या २४ तासांत ४ हजार ९८९ कोरोनाचे रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९७.८३ टक्क्यांवर पोहोचले आहे. बुधवारी मुंबईतील नोंदीत २ हजार ४७९ कोरोना रुग्ण आढळले. नवी मुंबईत एकाच दिवशी ४१४ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. ठाण्यात ३८८, रायगडमध्ये २५५, पुण्यात ३६४, पिंपरी चिंचवडमध्ये १९१, पनवेलमध्ये १४७, कल्याण-डोंबिवलीत १४४ एवढ्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. वसई विरार आणि मीरा-भाईंदरमध्येही अनुक्रमे १०३ आणि १०६ नवे कोरोनाचे रुग्ण तपासाअंती सापडले. राज्यात सध्या रुग्ण कोरोनाबाधित सापडण्याचे प्रमाण ०९.७३ टक्क्यांवर नोंदवले जात आहे. राज्यात आता २४ हजार ८६७ कोरोनाबाधितांना उपचार दिले जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.