कोरोना रुग्णसंख्या ९ हजाराच्या आतच, मृत्यूचा आकडा पुढे सरकतोय!

मुंबईमध्ये इमारतींमध्ये जोरात पसरणारा कोरोनाच्या विषाणूचा हा संसर्ग आता झोपडपट्टी व चाळींमध्ये पसरू लागला आहे. शुक्रवारपर्यंत मुंबईतील ९७ झोपडपट्टी व चाळी या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

85

मुंबईत मागील दहा दिवसांपासून कोविडबाधित रुग्णांची संख्या दहा हजाराच्या आतच राखण्यात अद्यापपर्यंत तरी महापालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले आहे. शुक्रवारी, 16 एप्रिल रोजी दिवसभरात ८,८३९ रुग्ण आढळून आले असून ९,०३३ रुग्ण बरे होवून घरी परतले आहे. मात्र, रुग्ण संख्या काही प्रमाणात वाढू न देता ती नियंत्रणात राखण्यात महापालिका यशस्वी ठरत असली, तरी दुसरीकडे मृत्यूच्या आकड्यानेही अर्धशतकी मजल मारलेली आहे, ही अत्यंत मुंबईकरांसाठी चिंतेची बाब समजली जात आहे.

५० हजार ५३३ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या!

मुंबईत जिथे गुरुवारी ८,२१७ बाधित रुग्ण आढळून आले आणि ४९ रुग्णांचा मृत्यू झाला होता, तिथे शुक्रवारी दिवसभरात ८,८३९ रुग्ण आढळून आले आहे. शुक्रवारी दिवसभरात ५० हजार ५३३ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे शनिवारी रुग्णवाढीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गुरुवारी ४५ हजार ४४६ संशयित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे ही रुग्ण संख्या काही प्रमाणात वाढली असली तरी शुक्रवारी ५० हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्यामुळे ही संख्या शनिवारी रुग्ण संख्या वाढवली जाईल, असे बोलले जात आहे. मात्र, शनिवारी ही संख्या न वाढल्यास या आजाराला नियंत्रणात ठेवण्यात महापालिकेला यश येत असून मुंबईत सुरक्षित झोनमध्ये तुर्तास तरी आहे, असे समजले जावू शकते.

(हेही वाचा : कधी दिसणार आपल्याला पांडुमधला पांडुरंग ?)

९ हजार ३३ रुग्ण बरे होवू घरी परतले!

शुक्रवारी दिवसभरात ९ हजार ३३ रुग्ण बरे होवू घरी परतले आहेत. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही आनंदाची बाब असली तरी ५३ रुग्णांच्या मृत्यू ही चिंतेत भर पाडणारी आहे. मृत्यू पावलेल्या ५३ रुग्णांमध्ये २६ रुग्ण हे दिर्घकालीन आजारी होती. म्हणजे निम्म्यापेक्षा जास्त रुग्णांना मोठे आजार नव्हते. तर मृत्यू पावलेल्यांमध्ये  ३६ पुरुष आणि १७ महिला रुग्णांचा समावेश आहे. सध्या मुंबईमध्ये विविध ठिकाणी ८२ हजार २२५ रुग्ण उपचार घेत आहे. म्हणजे हे सक्रीय रुग्ण आहेत. पण त्यापैंकी कोविड रुग्णालय तसेच कोविड सेंटर आदी ठिकाणी २० हजार २७९ रुग्ण उपचार घेत आहेत. तर आयसीयू बेडवर २७११ रुग्ण असून १३५८ रुग्णांना व्हेंटीलेटर लावण्यात आले आहे. तर ऑक्सिजन बेडवर १० हजार २४८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

मुंबईतील ९७ झोपडपट्ट्या, चाळी कंटेन्मेंट झोनमध्ये

मुंबईमध्ये इमारतींमध्ये जोरात पसरणारा कोरोनाच्या विषाणूचा हा संसर्ग आता झोपडपट्टी व चाळींमध्ये पसरू लागला आहे. शुक्रवारपर्यंत मुंबईतील ९७ झोपडपट्टी व चाळी या कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर १,१६९ इमारती या सिल करण्यात आल्या आहेत. तर दिवसभरात आढळून आलेल्या रुग्णांच्या अतिसंपर्कातील १,११० रुग्णांना सीसीसी वनमध्ये क्वारंटाईन करण्यात आले

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.