राज्यात ४२,५८२ नवे रुग्ण, ८५० जणांचा मृत्यू 

राज्यात गुरुवारी, ५४ हजार ५३५ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून,राज्यात आजपर्यंत एकूण ४६,५४,७३१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

जरी राज्यात दैनंदिन आढळून येणाऱ्या नवीन कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असली, तरी कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येत अद्यापही मोठी वाढ दिसून येत आहे. गुरुवार, १३ मे रोजी दिवसभरात राज्यात ८५० कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर ४२ हजार ५८२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

८८.३४ रिकव्हरी रेट!

राज्यात गुरुवारी, ५४ हजार ५३५ रूग्ण कोरोनातून बरे झाले असून, राज्यात आजपर्यंत एकूण ४६,५४,७३१ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.३४ टक्के एवढे झाले आहे. तर, राज्यात आजपर्यंत ७८ हजार ८५७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर १.५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,०३,५१,३५६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५२,६९,२९२ (१७.३६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३५,०२,६३० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत, तर २८,८४७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात गुरुवारी या दिवशी एकूण ५,३३,२९४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

(हेही वाचा : कोविशिल्डच्या दोन डोसमधील कालावधी वाढला… आरोग्य मंत्रालयाची माहिती)

महाराष्ट्रात लॉकडाऊन १ जूनपर्यंत वाढला! 

राज्य सरकारने १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारीच दिली होती. त्यानंतर गुरुवारी, १३ मे रोजी १ जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याचा अधिकृत आदेश प्रसिद्ध करत मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here