ERIS New Covid Variant : पुन्हा कोरोनाचा धोका! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा वेगाने प्रसार; ब्रिटनला विळखा

183
ERIS New Covid Variant : पुन्हा कोरोनाचा धोका! कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा वेगाने प्रसार; ब्रिटनला विळखा

गेल्या काही दिवसांपासून देशात साथीचा आजार झपाट्याने वाढतांना दिसत आहे. अशातच आता पुन्हा एकदा (ERIS New Covid Variant) कोरोनाच्या विषाणूंनी आपलं डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. या नव्या कोरोना व्हेरियंटचे (विषाणूचे) रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाच्या एका नवीन प्रकाराने ब्रिटनला विळखा घातला आहे. या नवीन कोरोना व्हेरियंटला एरिस (ERIS) असं नाव देण्यात आलं आहे.

ब्रिटनमध्ये पसरलेल्या या (ERIS New Covid Variant) व्हेरियंटला EG.5.1 म्हणून संबोधलं जातं आहे. त्यालाच EG.5.1 Eris असं टोपणनाव देखील देण्यात आले आहे. इंग्लंडमधील आरोग्य अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हेरियंट ओमायक्रॉनपासून तयार झाला आहे. कोरोनाचा हा नवीन प्रकार ओमायक्रॉन (Omicron) व्हेरियंटचं म्युटेशन असल्याचं सांगितलं जात आहे. याची लक्षणे खूप सामान्य आहेत.

(हेही वाचा – अठरा वर्षांखालील अल्पवयीनांना इंस्टाग्राम वापरण्यावर बंदी?, काय सांगतो सरकारचा नवीन नियम?)

ब्रिटनमध्ये एरिस व्हेरियंटचे वाढते रुग्ण

कोरोना व्हायरस (ERIS New Covid Variant) बदलत्या वातावरणानुसार स्वत: मध्ये बदल करत असल्याने नवीन व्हेरियंटचा धोका कायम आहे. त्यामुळे सर्व देशांनी कोरोनाबाबत सावध राहण्याची गरज आहे. यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सी (UKHSA) च्या मते, कोविड-19 चा एक नवीन प्रकार युनायटेड किंगडममध्ये वेगाने पसरत आहे, ज्यामुळे देशातील आरोग्य अधिकार्‍यांमध्ये चिंता वाढली आहे.

कोरोनाच्या नव्या विषाणूंची लक्षणे कोणती?

मीडिया रिपोर्टनुसार, एरिस कोरोना व्हेरियंटची (ERIS New Covid Variant) मुख्य लक्षणे ओमायक्रॉन सारखीच आहेत. यामध्ये घसा खवखवणे, नाक वाहणे, नाक चोंदणे, शिंका येणे, कोरडा खोकला, डोकेदुखी, कफ असलेला खोकला, स्नायू दुखणे आणि वास कमी होणे. दरम्यान, कोरोना रुग्णांमध्ये दम लागणे, वास कमी होणे आणि ताप ही आता मुख्य लक्षणे नाहीत. सध्याच्या खराब हवामानामुळे कोविड प्रकरणांमध्ये वाढ होऊ शकते, असं मत वॉर्विक विद्यापीठातील विषाणूशास्त्रज्ञ प्रोफेसर लॉरेन्स यंग यांनी व्यक्त केलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.