वाढता वाढता वाढे कोविडचा आजार: दिवसभरात ५६३१ रुग्णांची नोंद

126

कोविड रुग्ण वाढीचा आलेख दरदिवशी वाढतच जात असून शुक्रवारी दिवसभरात ५६३१ रुग्ण आढळून आले आहेत. गुरुवारी आढळून आलेल्या ३६७० रुग्णांच्या तुलनेत शुक्रवारी सुमारे २ हजार रुग्णांची वाढ होऊन ५६३१ रुग्ण आढळून आले. त्यामुळे ११०० पासून दरदिवशी वाढत जाणारी संख्या शुक्रवारी २००० ने वाढली. गुरुवारी दिवसभरात ४६ हजार ३३६ चाचण्या करण्यात आल्यानंतर ३६७१ नवीन रुग्ण आढळून आले होते, तिथे शुक्रवारी ४७ हजार ४७२ चाचण्या केल्यानंतर ५६३१ नवीन रुग्ण आढळून आले. तर दिवसभरात ५४८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये २ हजार ३७१ रुग्ण उपचार घेत होते, तर रुग्ण दुपटीचा दर हा ३६० दिवस एवढा आहे.

मुंबईत गुरुवारी ४ झोपडपट्या कंटेन्मेंट झोनमध्ये असताना शुक्रवारी ही संख्या ११ एवढी झाली आहे. तर सीलबंद इमारतींच्या संख्येतही झपाटयाने वाढ होत ८८ वरून १२५ वर पोहोचली आहे.

  • एकूण बाधित रुग्ण : ५६३१
  • बाधित पैकी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या:४२२३
  • शुक्रवारी रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण :४९७
  • एकूण दाखल रुग्ण : २३७५
  • एकूण उपलब्ध रुग्ण खाटा :३०५६५
  • रुग्ण दाखल असलेल्या खाटांची टक्केवारी : ७.८ टक्के
  • बरे झालेले रुग्ण : ५४८
  • विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण : २३७१
  • दिवसभरातील मृत रुग्णाची संख्या: ०१
  • दिवसभरात केलेल्या कोविड चाचण्या : ४७४७२
  • कंटेन्मेंट झोपडपट्टी: ११
  • सीलबंद इमारती : १२५

मागील तेरा दिवसांमधील बाधित रुग्णांची आकडेवारी

  • ३१ डिसेंबर २१: चाचण्या: ४७४७२, बाधित रुग्ण: ५३७१, मृत्यू :०१, बरे झालेले रुग्ण: ५४८
  • ३० डिसेंबर २१: चाचण्या ४६,३३६, बाधित रुग्ण- ३६७१, मृत्यू-०, बरे झालेले रुग्ण- ३७१
  • २९ डिसेंबर २१: चाचण्या ५१, ८४३, बाधित रुग्ण- २५१०, मृत्यू-१, बरे झालेले रुग्ण- २५१
  • २८ डिसेंबर २१ : चाचण्या -३२,३६९, बाधित रुग्ण – १३७७, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -३३८
  • २७ डिसेंबर २१ : चाचण्या -४३,३८३, बाधित रुग्ण – ८०९, मृत्यू -३, बरे झालेले रुग्ण -३३५
  • २६ डिसेंबर २१ : चाचण्या -३४,८१९, बाधित रुग्ण – ९२२, मृत्यू -२, बरे झालेले रुग्ण -३२६
  • २५ डिसेंबर २१ : चाचण्या -४२,४२७ बाधित रुग्ण – ७५७, मृत्यू -०, बरे झालेले रुग्ण -२८०
  • २४ डिसेंबर २१ : चाचण्या -४०,४७२, बाधित रुग्ण – ६८३, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -२६७
  • २३ डिसेंबर २१ : चाचण्या -३९,४२३, बाधित रुग्ण – ६०३, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -२०७
  • २२ डिसेंबर २१ : चाचण्या -४५,०१४, बाधित रुग्ण – ४०९, मृत्यू -०, बरे झालेले रुग्ण -२२९
  • २१ डिसेंबर २१ : चाचण्या – ३७,९७३, बाधित रुग्ण – ३२७, मृत्यू -१, बरे झालेले रुग्ण -२२७
  • २० डिसेंबर २१ : चाचण्या -३०,६७२, बाधित रुग्ण – २०४, मृत्यू -०, बरे झालेले रुग्ण -२२९
  • १९ डिसेंबर २१ : चाचण्या -४०,८५७, बाधित रुग्ण – ३३६, मृत्यू -२, बरे झालेले रुग्ण – २०१
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.