दहावी-बारावीच्या परीक्षा संपल्यावर आता राज्यात पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. परीक्षा संपल्यावर या सर्व मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची चाहूल लागते. वार्षिक परीक्षांचा निकाल लागल्यावर मे महिन्यात उन्हाळी सुट्ट्यांना सुरूवात होते आणि जून महिन्यात पुन्हा एकदा नवे शालेय वर्ष सुरू होते. यंदाच्या वर्षी जूनमध्ये शाळा केव्हा सुरू होणार? याबाबत जाणून घेऊया…
( हेही वाचा : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाकडून ९ महिन्यांमध्ये ६२०० रुग्णांना ५० कोटींची मदत! )
यंदाच्या वर्षी २ मे २०२३ पासून साधारणत: सर्व माध्यमिक आणि प्राथमिक शाळांना सुट्ट्या सुरू होणार आहेत. या उन्हाळी सुट्ट्या थेट जून महिन्यात संपणार आहेत. राज्यातील बहुतांश शाळा १२ जून २०२३ रोजी पुन्हा सुरू होतील आणि नव्या शैक्षणिक वर्षासह विद्यार्थ्यांच्या शाळेचा १२ जून हा पहिला दिवस असेल.
सुट्ट्यांची संख्या झाली कमी?
कोरोना काळात शैक्षणिक वर्षांमध्ये अनेक व्यत्यय आले त्यामुळे शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या कमी करण्यात आल्या आहेत. यंदाच्या संपूर्ण शैक्षणिक वर्षात सुट्ट्यांचा आकडा ७६ पेक्षा कमी असेल याची काळजी घ्यावी असे आवाहन शिक्षण अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community