Google Map या अ‍ॅपमध्ये नवे फिचर! प्रवासादरम्यान पैसे वाचवण्याची संधी

अलिकडे प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो. स्मार्टफोनमधील आधुनिक अ‍ॅप्समुळे आपली दैनंदिन कामे अगदी सहज पूर्ण होतात. कोणत्याही अनोळख्या जागी प्रवास करताना किंवा रस्त्यावर किती ट्रॅफिक आहे हे पाहण्यासाठी आपण रोज गुगल मॅप (Google Map) या अ‍ॅपचा वापर करतो. परंतु आता गुगल मॅप या अ‍ॅपमध्ये आणखी एका फिचरचा समावेश केला जाणार आहे यामुळे तुमचा प्रवास अधिक सोपा होईल आणि तुमचे पैसेही वाचतील जाणून घेऊया या नव्या फिचरबद्दल…

( हेही वाचा : Budget Trip : पावसाळ्यात फिरण्यासाठी सुंदर आणि हटके जागा!)

गुगल मॅपवर (Google Map) मिळणार टोलची माहिती 

गुगल मॅप या अ‍ॅपवर जगभरात एप्रिलमध्ये हे फिचर रिलीज करण्यात आले होते परंतु भारतात आता हे फिचर सुद्धा उपलब्ध होणार आहे. भारतासह इंडोनेशिया, जपान आणि अमेरिकेत ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. Android आणि iOS दोन्ही युझर्स याचा वापर करू शकतात. गुगल मॅप या अ‍ॅपवर संपूर्ण प्रवासादरम्यान तुम्हाला किती टोल भरावा लागेल याची माहिती मिळणार आहे. तुम्ही बाहेरगावी किंवा लांबचा प्रवास करणार असाल आणि गुगल मॅपवर तुम्ही मार्ग सेट केलात तर तुम्हाला या संबंधित मार्गासाठी किती टोल भरावा लागेल याची माहिती मिळेल. टोलच्या किमतीनुसार तुम्ही मार्ग निवडू शकता आणि प्रसंगी टोल-फ्री मार्ग निवडून तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकता.

( हेही वाचा : ‘बेस्ट’ने जारी केली मे महिन्यात गहाळ झालेल्या स्मार्टफोनची यादी)

हे फिचर अ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी तुम्हाला अ‍ॅप ओपन करावा लागेल यानंतर रूट ऑप्शन पाहण्यासाठी तीन डॉट्सवर क्लिक करावे किंवा स्क्रिनवर स्वाइप-अप करावे लागेल, येथे तुम्हाला चेंज टोल सेटिंग्ज ( Change toll setting) हा पर्याय निवडावा लागेल यामध्ये तुम्हाला प्रवासादरम्यान कोणता टोल मार्ग निवडायचा याची माहिती मिळेल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here