“वीज न भरल्यामुळे आज रात्री दहा वाजल्यापासून तुमची इलेक्ट्रीसीटी जोडणी तोडली जाणार आहे. हे टाळण्यासाठी कृपया आमच्या या अधिकृत क्रमांकावर तातडीने संपर्क साधावा” …असा मेसेज तुम्हाला आला आहे का ? तर सावधान …हा आता नवीन फ्राॅड आहे.
सध्या अनेक प्रकारचे फ्राॅर्डस होत असतात. फिशिंग हा आपल्या खासगी माहितीवर हल्ला करण्याचा एक प्रकार आहे. यामध्ये समोरच्याचा डेटा घेण्यासाठी हे जाळे विणले जाते. एखाद्या व्यक्तीला ईमेल, मेसेज किंवा मजकूर पाठवला जातो. नंतर त्या व्यक्तीच्या खात्यावर ताबा मिळवला जातो.
असा केला जातो फ्राॅड
त्यामुळे तुम्हाला असा मेसेज आला, तर तो फ्राॅड आहे हे नक्की. असेच मेसेज याआधी टेलिफोनच्या बिलांच्या संदर्भातदेखील आलेले आहेत. आपण बिल भरलेले नसेल तरीही मेसेजमधून आलेल्या नंबरशी संपर्क साधण्याचे कारण नाही. वीज मंडळ किंवा टेलिफोन कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राचे अधिकृत फोन नंबर त्यांच्या संकेत स्थळावर मिळतात. त्यावर त्यांच्याशी संपर्क साधणे सोपे जाते.
( हेही वाचा: MHADA Lottery: मुंबईत 3015 घरांची सोडत )
असे मेसेजकेड शक्यतो दुर्लक्ष करा
त्यामुळे अशा फसव्या मेसेजमध्ये दिलेल्या नंबरवर तुम्ही फोन करणे चुकीचे आहे. अशा नंबरशी तुम्ही संपर्क साधला, तर नंतर तुमच्या बॅंक खात्याचा नंबर, त्याचा पिन नंबर इत्यादी महत्त्वाची माहिती भरायला सांगण्यात येते. तुम्ही ही माहिती भरली की तुमच्या खात्यातून भलीमोठी रक्कम काढून घेतली जाते. त्यामुळे अशा मेसेजकडे दुर्लक्ष करणेच उत्तम.