हॉटेलमधील सेवा नि:शुल्कच; Service Tax चा आग्रह केल्यास येथे करा तक्रार

73

केंद्रीय ग्राहक हक्क संरक्षण प्राधिकरणाने हॉटेल आणि रेस्टॉरंटकडून केल्या जाणाऱ्या सेवा शुल्क (service tax) वसुलीसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. सेवा शुल्क वसुलीसंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होती. सीसीपीएच्या निर्णयानुसार कोणतेही हॉटेल किंवा रेस्टॉरंट ग्राहकांना सेवा दिल्याबद्दल त्यांच्याकडून सेवा शुल्क वसुली करू शकत नाहीत.

( हेही वाचा : बेस्ट बसमार्गात ‘असे’ होणार बदल! जाणून घ्या… )

वेबसाइटवर तुम्हाला तक्रार नोंदवता येणार

एखाद्या ग्राहकाकडून सेवा शुल्क (service tax)वसूल करण्यात आल्यास याची तक्रार ग्राहक आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने सादर करता येणार आहे. edaakhil.nic.in या वेबसाइटवर तुम्हाला तक्रार नोंदवता येणार आहे. सेवाशुल्क देणे किंवा न देणे हे संपूर्ण ग्राहकांच्या निर्णयावर अवलंबून आहे. ग्राहकांना सेवा शुल्क देण्यासाठी सक्ती करू शकत नाहीत असे सीसीपीएन स्पष्ट केले आहे. तसेच, ग्राहक चौकशी आणि सीसीपीएतर्फे पुढील कारवाई होण्यासाठी आपली तक्रार  संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे नोंदवू शकतो. सीसीपीएकडे तक्रार नोंदविण्यासाठी com-ccpa@nic.in येथे ई-मेल देखील करता येईल.

मार्गदर्शक सूचना जारी

हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांकडून ५ ते १५ टक्क्यांपर्यंत सेवा शुल्क आकारले जाते. हॉटेलमध्ये ५ टक्के जीएसटी आणि रेस्टॉरंटमध्ये १८ टक्के जीएसटी आकारला जातो. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी रेस्टॉरंटमध्ये कोणत्याही पदार्थांच्या बिलावर जबरदस्तीने सेवाशुल्क आकारता येणार नाही, सेवाशुल्क ( Service tax) ग्राहकांसाठी वैकल्पिक असे यासंदर्भातील मार्गदर्शक सूचना सीसीपीएकडून जारी करण्यात आल्या आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.