राज्यात ‘या’ जिल्ह्यांमध्ये निर्बंध झाले शिथिल! असे आहेत नवीन नियम

कोरोनाच्या दुस-या लाटेपासून राज्यात ब्रेक दि चेन अंतर्गत निर्बंध लावण्यात आले होते. मात्र, आता राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या कमी आहे, त्या जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील 36 पैकी 22 जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले असून, 11 जिल्ह्यांतील निर्बंध हे कायम ठेवण्यात आले आहेत. तसेच मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातील निर्बंधांबाबतचे अधिकार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागाला देण्यात आले आहेत.

दुकानांची वेळ बदलली

ज्या जिल्ह्यांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे, त्या जिल्ह्यांमध्ये सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरू राहतील. तर शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

काय आहेत नवे नियम?

  • जिम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. तर शनिवारी दुपारी 3 वाजेपर्यंत सुरू राहणार.
  • बाग आणि खेळांची मैदाने व्यायामासाठी खुली राहणार.
  • शासकीय आणि खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी. मात्र, गर्दी टाळण्यासाठी वेळांमध्ये बदल करण्याचे निर्देश.
  • सिनेमा आणि नाट्यगृहे पुढील निर्देश येईपर्यंत पूर्णतः बंद राहतील
  • हॉटेल दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार. मात्र, पार्सल सेवा कायम राहणार
  • सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार
  • रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी कायम.
  • गर्दी टाळण्यासाठी सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रम, मोर्चे यांच्यावर असलेली बंधने कायम राहतील.
  • नियमांचे उल्लंघन करणा-यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल.

लोकलबाबत निर्णय नाहीच

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लाईफ लाईन असलेल्या लोकलचा प्रवास सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आला. सर्वसामान्यांसाठी बंद असलेली ही लोकल कधी सुरु होणार, असा सवाल विचारला जात असताना निर्बंधांमध्ये देखील लोकलबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. सोमवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये पहिल्या टप्प्यात लोकलचा निर्णय करणे थोडे कठीण असल्याचे सांगितले होते. त्यामुळे आणखी काही दिवस सर्वसामान्यांना लोकलची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here