गोव्यात जाऊन फोटो काढताय? तर सावधान; आधी ही बातमी वाचाच

सध्या पर्यटनाचा हंगाम सुरु आहे. प्रत्येकजण कुठे ना कुठे तरी फिरायला जात आहे. तुम्हीसुद्धा जर फिरायला जायचा प्लॅन बनवला असेल आणि गोव्याला जाणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तिथे गेल्यावर कोणत्याही पर्यटकाबरोबर तुम्हाला विना परवानगी सेल्फी किंवा फोटो घेता येणार नाहीत. त्या पर्यटकाच्या प्रायव्हसीची काळजी घेऊन परवानगी घेणे आवश्यक आहे. याबाबत आता नवी गाईडलाईन्स सरकारकडून जारी करण्यात आली आहे.

पर्यटन विभागाकडून सूचना

नवी गाईडलाईन्स गोवा पर्यटन विभागाने पर्यटकांसाठी प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा भाग आहे. याचा उद्देश पर्यटकांच्या गोपनीयतेचे रक्षण करणे, त्यांची सुरक्षितता जपणे आणि अनैतिक घटना टाळणे, तसेच त्यांची फसवणूक होऊ नये हा आहे. कोणत्याही पर्यटकासोबत सेल्फी घेण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी आधी त्याची परवानगी घ्या, विशेषत: तुम्ही ज्या व्यक्तिसोबत सेल्फी किंवा फोटो घेणार असाल ती व्यक्ती जर समुद्रात पोहत असेल तर त्याच्या प्रायव्हसीचा अदर करा, असे जारी करण्यात आलेल्या निवदेनात म्हटले आहे.

( हेही वाचा: नेपाळमधील 6 कोटी वर्षे प्राचीन शिळांपासून बनविणार अयोध्येतील श्रीरामाची मुर्ती )

धोकादायक ठिकाणी सेल्फी टाळा

अपघात टाळण्यासाठी खडकाळ भाग आणि समुद्रातल्या धोकादायक ठिकाणी सेल्फी घेण्यासही पर्यटकांना मनाई करण्यात आली आहे. गोव्याला भेट देणा-या प्रवाशांची भिंतीवर काहीही लिहू वारसास्थळांची नासधूस किंवा नुकसान करु नये, असा सल्लाही देण्यात आला आहे. स्मारके विद्रूप करण्याचा प्रयत्न करु नये, असेही म्हटले आहे. बेकायदा खासगी टॅक्सी भाड्याने घेऊ नका. जास्त भाडे आकारणे टाळण्यासाठी मीटरच्या भाड्यानेच प्रवास करा, असेही त्या अॅडव्हायजरीमध्ये म्हटले आहे. गोव्यात येणा-या पर्यटकांना सरकारने सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here