करा आता लगीनघाई… राज्य सरकारने दिली ‘ही’ मुभा!

100

डिसेंबर-जानेवारीत ओमायक्रॉनच्या वाढत्या पार्श्वभूमीवर सरकारने निर्बंध लागू केले होते. या निर्बंधांमध्ये बदल करत सरकारने आता, सुधारित नियमावली जाहीर केली आहे. 1 फेब्रुवारी 2022 पासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच, लग्नसोहळे आणि अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळेच लग्नासाठी 200 व्यक्ती उपस्थित राहू शकतील, तर अंतिम संस्कारासाठी कोणतेही निर्बंध नसतील. असे नियमावलीद्वारे सरकारने स्पष्ट केले आहे.

( हेही वाचा : टीईटी घोटाळ्यांमुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे कामकाजच थंडावले! )

१ फेब्रुवारी २०२२ पासून जारी केलेली सुधारित नियमावली 

१. सर्व राष्ट्रीय उद्याने आणि  जंगल सफारी नियमित वेळेनुसार चालू होणार आहेत. पर्यटकांनी ऑनलाईन तिकिट बुकिंग करत, पर्यटकांचे संपूर्ण लसीकरण असणं आवश्यक आहे. तसेच मास्कही वापरण्यात यावा.

२. अंत्यसंस्कारांना उपस्थित राहणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर मर्यादा नसेल.

३. जलतरण तलाव, वॉटर पार्क 50 टक्के क्षमतेने खुले राहतील.

४. हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची वेळ स्थानिक प्रशासन ठरवणार आहे.

५. ब्युटी पार्लर, सलून 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

६. समुद्रकिनारे, उद्याने स्थानिक प्रशासनाने ठरवून दिलेल्या वेळेनुसार सुरू राहतील.

७. सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या 25 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळेच लग्नासाठी 200 व्यक्ती उपस्थित राहू शकतील, तर अंतिम संस्कारासाठी कोणतेही निर्बंध नसतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.