Atul Save : राज्य शासनाचे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण – मंत्री अतुल सावे

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला परवडणारे घर मिळावे, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.

324
Atul Save : राज्य शासनाचे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण - मंत्री अतुल सावे
Atul Save : राज्य शासनाचे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण - मंत्री अतुल सावे

महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला परवडणारे घर मिळावे, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. याच अनुषंगाने नवीन गृहनिर्माण धोरण आखले जात आहे लवकरच नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती गृहनिर्माण तसेच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी (२४ नोव्हेंबर) दिली.

नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काऊंसिल (NAREDCO) च्यावतीने बांद्रा कुर्ला संकुलमध्ये देशातील सर्वात मोठे होमथॉन प्रॉपर्टी एक्सोचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन सावे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नारडेकोचे अध्यक्ष संदीप रुणवाल, सचिव अभय चांडक, माजी अध्यक्ष निरंजन हिरानंदानी, राजन बंदलकन, अभिनेता रितेश देशमुख, जेनेलिया देशमुख, अभिनेते सचिन खेडेकर आदी उपस्थित होते. (Atul Save)

सावे म्हणाले की, अन्न, पाणी, निवारा ही सर्वांची गरज असून ती पूर्ण करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे. मुंबई महानगर परिसरात जागेची मर्यादा असल्याने आम्ही झोपडपट्टी पुनर्वसन सारख्या योजना राबवत आहोत. या शिवाय मुंबईत, मुंबई मेट्रो, एमटीएचएल, मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे, सी लिंक प्रकल्प, कोस्टल रोड, धारावी पुनर्विकास प्रकल्प इत्यादीसारखे मोठे इन्फ्रा प्रकल्प सुरू आहेत. मुंबईला सर्वात विकसित शहर बनवत आहोत. (Atul Save)

राज्य सरकार मुंबई आणि राज्यात अधिकाधिक घरे निर्माण करण्यासाठी राज्याच्या गृहनिर्माण क्षेत्रातील अनेक प्रलंबित प्रश्न नव्या गृहनिर्माण धोरणात सोडवले जातील, असे सावे यांनी नमूद केले. नवीन धोरणासाठी विकासकांनी सूचना कराव्यात, त्यांचा नव्या धोरणात समावेश केला जाईल. (Atul Save)

(हेही वाचा – Winter Session : नागपूरची थंडी बोचण्याआधीच परिपत्रक बोचले)

New Project 1 2

म्हाडाच्या माध्यमातून आम्ही बीडीडी चाळ पुनर्विकास, गिरणी कामगारांसाठी घरे, म्हाडाच्या इमारतीचा पुनर्विकास, आणि उपकर आणि उपकर नसलेल्या इमारती इत्यादी प्रमुख प्रकल्प घेतले आहेत. शहरात जवळपास १३ हजार उपकर इमारती आहेत ज्यांना पुनर्विकास करण्याची गरज आहे. येत्या काही दिवसांत जवळपास ७५ हजार गिरणी कामगारांना घरे द्यायची आहेत, असे सावे यांनी स्पष्ट केले. विविध विकास प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ही संघटना सरकारला सहकार्य करत आहेत. (Atul Save)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.