TDS Return : टीडीएस रिटर्नसाठी १ ऑक्टोबर पासुन नवीन नियम

169
TDS Return : टीडीएस रिटर्नसाठी १ ऑक्टोबर पासुन नवीन नियम
TDS Return : टीडीएस रिटर्नसाठी १ ऑक्टोबर पासुन नवीन नियम

TDS रिटर्न भरणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. कर विभागाने टीडीएस रिटर्नसाठी नवीन नियम लागू केला आहे. CBDT ने १ ऑक्टोबर २०२३ पासून नवीन बदल केला आहे. तुमच्या TDS मध्ये काही नवीन समस्या असल्यास या नवीन नियमाने ती सहज सोडवली जाऊ शकते. (TDS Return)

CBDT ने ऑगस्ट २०२३ मध्ये इलेक्ट्रॉनिक फॉर्म ७१ जाहीर केला होता. जर तुमचा टीडीएस चुकीच्या वर्षात कापला गेला असेल, म्हणजे उत्पन्न दुसर्‍या एखाद्या वर्षी दाखवले गेले असेल आणि दुसर्‍या वर्षी टीडीएस कापला गेला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही

प्राप्तिकर कायदा १९६२ मध्ये सुधारणा

या फॉर्मद्वारे चुकीच्या वर्षात कापला गेलेला टीडीएसमध्ये सहज बदल करता येणार आहेत. यासाठी आयकर कायदा 1962 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. मात्र, सध्या फक्त गेल्या २ वर्षांसाठीच ही सुधारणा करण्यात आली आहे.

(हेही वाचा : GST Action on LIC : जीएसटी विभागाची एलआयसी कंपनीवर कारवाई; ठोठावला इतक्या कोटींचा दंड)

फॉर्म भरण्याची प्रक्रिया काय आहे?

तुम्हाला फॉर्म ७१ फक्त इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मिळेल. सबमिशनसाठी डिजिटल स्वाक्षरी आवश्यक असेल. यासोबतच इलेक्ट्रॉनिक व्हेरिफिकेशन कोडही आवश्यक असेल.

  •  प्राप्तिकर साइटवरून फॉर्म ७१ डाउनलोड करावा लागेल.
  • फॉर्ममध्ये आपल्याला नाव, पॅन, पत्ता, उत्पन्न, वर्ष, कोणत्या वर्षी TDS कापला गेला, किती TDS कापला गेला, आपण TDS चा दावा का करत आहोत अशी माहिती भरावी लागेल.
  •  नंतर स्वाक्षरी करा आणि सबमिट करा. जसे आपण आयटीआर पडताळणी करतो अगदी त्याच पद्धतीने या फॉर्मची देखील पडताळणी करावी लागेल.
  •  यासाठी डिजिटल स्वाक्षरी आवश्यक असेल.
  •  यानंतर, तुमचा दावा योग्य असल्यास तुमचे पैसे परत केले जातील.

हेही पहा  –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.