नोकरदारांसाठी महत्वाची बातमी! आता पीएफवरील व्याजावरही लागणार कर! 

२०१६ मध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या एकूण रकमेपैकी ६० टक्के रकमेच्या व्याजावर कर लावण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र त्याला विरोध झाला होता.

कालपर्यंत पीएफची रक्कम आणि त्यावर मिळणारे व्याज हे करमुक्त होते, मात्र आता केंद्र सरकारने नवीन नियम घेतला आहे. त्यानुसार आता नोकरदारवर्गाच्या पीएफवर मिळणाऱ्या व्याजावर कर आकारण्यात येणार आहे, अशी नियमावली केंद्र सरकारने अधिसूचित केली आहे.

या नियमावलीनुसार सध्याची पीएफच्या खात्यांची विभागणी करण्यात येणार आहे. त्यानुसार त्यातील एक खाते हे पीएफवरील व्याज मोजण्यासाठी असेल, असे या नियमावलीत म्हटले आहे. नवीन अधिसूचनेनंतर, सर्व कर्मचारी भविष्य निधी खाती करपात्र आणि कर-नसलेल्या योगदान खात्यांमध्ये विभागली जाणार आहेत. ३१ मार्च २०२१ पर्यंत भविष्य निर्वाह निधीच्या कोणत्याही योगदानावर कोणताही कर लावला जाणार नाही, मात्र २०२०-२१ आर्थिक वर्षानंतर पीएफ खात्यांवर मिळणारे व्याज करपात्र असेल आणि त्याची स्वतंत्र गणना केली जाईल. पीएफ खात्यात २०२१-२२ आणि त्यानंतरच्या वर्षांमध्ये वेगवेगळी खाती असणार आहेत.

याधीही घेतलेला निर्णय, त्याला झाला होता विरोध!

नवीन नियम १ एप्रिल २०२२ पासून लागू होणार आहे, मात्र परंतु २०२१-२२ आर्थिक वर्षापर्यंत, जर तुमच्या खात्यात वार्षिक ठेव २.५ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यावर मिळणारे व्याज करपात्र असेल आणि त्यावर तुम्हाला कर भरावा लागेल. लोकांना पुढील वर्षाच्या आयकर विवरणपत्रात या व्याजाची माहिती द्यावी लागेल. याआधीही २०१६ मध्ये कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या एकूण रकमेपैकी ६० टक्के रकमेच्या व्याजावर कर लावण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र त्याला विरोध झाला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here