केंद्र सरकारकडून लवकरच नवीन श्रम कायदा अर्थात न्यू लेबर कोड (New Labour Code) लागू करण्यात येणार आहे. या कायद्यानुसार कामगार आणि कर्मचाऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. नवीन श्रम कायद्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणून ‘सामाजिक सुरक्षा कायदा’ सुद्धा यात समाविष्ट करण्यात आला आहे. या सामाजिक सुरक्षा कायद्यामुळे संघटीत आणि असंघटीत क्षेत्रातील कामगारांना मोठा फायदा होणार आहे.
( हेही वाचा : मुंबई मेट्रोमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! मिळेल १ लाखांहून अधिक पगार, ‘येथे’ करा अर्ज)
नवीन श्रम कायाद्याची अंमलबजावणी लवकरच सुरू करण्यात येणार आहे, भारतातील बहुतांश राज्यांनी यासाठी सहमती दर्शवली आहे. या नव्या कायद्याअंतर्गत कामगारांना सामाजिक सुरक्षा, लैंगिक समानता, कल्याणकारी योजनांचा फायदा होणार आहे.
नव्या कायद्याअंतर्गत ३ महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर
- नवीन कायदा हा कायमस्वरूपी आणि कंत्राटी अशा दोन्ही कामगारांसाठी फायदेशीर असणार आहे. कामगार वर्गाला सर्वाधिक सामाजिक सुरक्षा या कायद्याअंतर्गत दिली जाईल.
- या कायद्यानुसार लैंगिक समानतेवर भर देण्यात आला आहे. कामाच्या जागी महिलांना अधिक सुरक्षित आणि चांगले वातावरण निर्माण करून देण्याचा प्रयत्न यामार्फत होणार आहे. मातृत्वात मिळणारे लाभ, बालसंगोपनासाठी सुविधा, रात्रपाळीत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना विशेष फायदा होईल.
- कर्मचाऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना सुरू करण्यात येतील तसेच जोखीम असलेल्या उद्योगांना समावेश ESI मध्ये केला जाईल. कर्मचाऱ्यांकडे निवृत्तीच्यावेळी जास्त पैसे शिल्लक राहतील. नव्या कायद्यानुसार ग्रॅच्युइटी आणि पीएफ वाढलेला असेल. कोणत्याही परिस्थितीत एकूण पगाराच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा भत्ता असू शकत नाही.