- ऋजुता लुकतुके
केंद्रसरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा देताना आता एलटीसीचे नियम अधिक लवचिक केले आहेत. एकूण ३८५ प्रमिअम श्रेणीतील रेल्वे गाड्यांनाही एलटीसी लागू होणार आहे. यात १३६ वंदे भारत, ९७ हमसफर आणि ८ तेजस एक्सप्रेस आहेत. राजधानी, ड्युरांटो आणि शताब्दी या इतर १४४ गाड्यांनाही एलटीसी लागू होणार आहे. भारतीय रेल्वेनं नवीन पत्रक काढून ही माहिती दिली आहे. (New LTC Rule)
‘लहान व मध्यम पल्ल्याच्या वंदे भारत, तेजस व शताब्दी ट्रेनमध्ये ११ व १२ व्या श्रेणीपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना चेअर कार बुकिंगसाठी एलटीसी वापरता येईल. तर १२ व त्यावरील श्रेणीतील कर्मचाऱ्यांना एक्झिकिटिव्ह श्रेणीचं बुकिंग करता येईल. तसंच दीर्घ पल्ल्याच्या स्लिपर ट्रेनमध्ये स्लिपरचं बुकिंग करताना ११ व्या श्रेणीपर्यंतचे कर्मचारी एसी ३ टिअरचं तर त्यावरील अधिकारी एसी २ टिअरचं बुकिंग करू शकतील,’ असं या पत्रकात म्हटलं आहे. (New LTC Rule)
(हेही वाचा – Mahakumbh : विमान बुकिंगमध्ये १६२ टक्के तर हॉटेल व्यवसायात ३ पटीने वाढ; ४ लाख कोटींची अंदाजित उलाढाल)
एलटीसी म्हणजे लीव्ह ट्रॅव्हल कन्सेशन. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी दर दोन वर्षांतून एकदा आणि एरवी सुटीसाठी जाण्यासाठी ४ वर्षांतून एकदा भरपगारी रजा आणि तिकिटाची रक्कम परत मिळते. या सुविधेला एलटीसी असं म्हणतात. मध्यंतरी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या या सुविधेत सुधारणा करण्याची शिफारस केली होती. (New LTC Rule)
कोणाला मिळणार एलटीसी?
- प्रशासकीय सेवेत रुजू झालेले विविध पदांवरील अधिकारी, संरक्षण दलात प्रशासकीय सेवेतून भरती झालेले अधिकारी
- केंद्रसरकारने नियुक्त केलेले राज्यसरकारच्या सेवेतील अधिकारी
- केंद्रसरकारच्या सेवेतील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी
- निवृत्तीनंतर पुन्हा भरती झालेले कर्मचारी
स्थानिक प्रवासासाठी एलटीसी भत्ता मिळत नाही. तर सलग प्रवासासाठी एका गावाहून दुसऱ्या गावातील तिकिटावर एलटीसी लागू होतो. कर्मचाऱ्यांनी आधी खर्च करून तिकिटं सादर केल्यावर तिकिटाचे पैसे त्यांना परत मिळतात.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community