राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी घेतला आहे.
( हेही वाचा : हिमाचल आणि उत्तराखंडमध्ये पावसाचा हाहाकार; भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, अनेक लोक बेपत्ता)
वैद्यकीय शिक्षण विभागाने या संदर्भात बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यातील १२ जिल्ह्यांमध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही महाविद्यालये उभारण्यासाठी एशियन डेव्हलपमेंटकडून ४ हजार कोटींचं कर्ज दिले जाणार आहे. या कामांना लवकरच सुरूवात होईल. केंद्र सरकारकडूनही निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन गिरीश महाजन यांनी दिले आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली सर्वांनी एकमताने हा निर्णय घेतला आहे. मागील पाच वर्षात एकाही वैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी दिलेली नव्हती परंतु आता हा निर्णय घेण्यात असून या नागरिकांना फायदा होणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली.
या जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार…
गडचिरोली, वाशिम, हिंगोली, बुलढाणा, भंडारा, पालघर, ठाणे, अहमदनगर, अमरावती, जालना, मुंबई उपनगर आणि वर्धा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार आहेत.
Join Our WhatsApp Community